पुणे दि २२ :- पुणे येथे दि २५ फेब्रुवारी ते २६ – ०२ – २०२० रोजी बै.जी.वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय , पुणे येथे ४६ व्या वार्षिक संशोधन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे . या वार्षिक परिषदेचे उद्घाटन दि . २५ रोजी सकाळी १० वा.डॉ . संजय मेहेंदळे, संचालक (संशोधन) हिंदुजा हॉस्पिटल , मुंबई यांच्या हस्ते होणार आहे . या वेळी प्रा . डॉ . दिलीप म्हैसेकर , कुलगुरू महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापीठ , नाशिक व डॉ . प्रवीण शिनगारे , प्र – कुलपती , कृष्णा इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्सेस , कराड हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत . संयोजन समितीला १७४ शोध निबंध प्राप्त झाले आहेत . तसेच पदवीपूर्व , पदव्यूत्तर आणि अध्यापकांसाठी कार्यशाळा आयोजित केल्या आहेत . पौगंडावस्थेतील व्यसनाधीनता या विषयावर पदवीपूर्व विद्याथ्यांसाठी पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे दि २५ रोजी डॉ . बी . बी . दीक्षित ओरेशन , डॉ . कपिल झिरपे हे मार्गदर्शन करणार आहेत . डॉ . लता कपूर , डॉ . एन . एम . शामा सुंदर . डॉ . प्रशांत छाजेड , डॉ . भावना टाकळकर , डॉ . स्वाती भावे हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत . कार्यशाळा आयोजित केल्या आहे . दि .२५ रोजी संदर , डॉ . प्रशांत छाजे दि .२६ रोजी डॉ . हृषिकेश सराफ , डॉ . रुपेश घ्यार , डॉ . यशवंत आमडेकर , डॉ . आनंद पंडित . डॉ . सचिन मामीडवार यांची व्याख्याने होणार आहेत . वैद्यकीय व्यवसायातील न्यायवैद्यकीय प्रकरणे या विषयावर परिसंवाद होणार आहे . या परिसंवादात डॉ . शैलेश मोहिते . डॉ . चारुचंद्र जोशी , डॉ . सुधीर संत . अडव्होकेट हृषिकेश गान . डी सी . पी . बच्चन सिंग , डॉ . नरेश झंझाड व डॉ . मंदार अंबिके सहभागी होणार आहेत . उच्च शिक्षणातील ताणतणावाचे व्यवस्थापन या विषयी डॉ . राजेंद्र बर्वे हे मार्गदर्शन करणार आहेत . अशी माहिती डॉ . अजय चंदनवाले , सह संचालक , वैद्यकीय शिक्षण व संशोधन , मुंबई तथा अधिष्ठाता , बै . जी . शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय , पुणे यांनी दिली . एकूण १४०० डॉक्टरांनी या वार्षिक परिषदेत सहभाग नोंदविल्याची माहिती संयोजन सचिव डॉ .अंजली पाटील , प्राध्यापक व विभाग प्रमुख . शरीररचनाशास्त्र विभाग व डॉ . संजय गायकवाड , प्राध्यापक व विभाग प्रमुख , पल्मोनरी मेडिसिन यांनी दिली . यावेळी रिसर्च सोसायटीच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष डॉ . विश्वनाथ येमुल . उपाध्यक्ष डॉ . प्रज्ञा भालेराव , सचिव डॉ . पदमसेन रणबागले . खजिनदार डॉ . सर्फराज पठाण , सदस्य डॉ . सोमनाथ सलगर हे उपस्थित होते .