चिपळूण :- गुणदे प्रशालेत दहावीचा शुभेच्छा कार्यक्रम संपन्न
सदगुरू काडसिद्धेश्वर विद्यालय गुणदे म्हणजे संस्कारांची पेरणी अन् जोपासना करणारी शाळा – श्री.विनायक वैद्य, व्यवस्थापक –डाऊ केमिकल्स लोटे सरस्वती शिक्षण संस्था (गुणदे आवाशी,शेल्डी,माणी) संचलित सदगुरु काडसिद्धेश्वर विद्यालय गुणदे प्रशालेत एस.एस.सी.मार्च २०२० परीक्षेसाठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा समारंभ आगळ्यावेगळ्या सांस्कृतिक पद्धतीने संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरवातीला सरस्वती पूजन श्री.विनायक वैद्य,गुरुपूजन श्री.संजय मोरे, गणेश पूजन सरस्वती शिक्षण संस्थेचे सचिव श्री.सुभाष पवार व दीपप्रज्वलन संस्थेचे सहसचिव व जि.प.सदस्य राजेंद्र आंब्रे,श्री.संजय आंब्रे,सौ.अश्विनी जोशी, सौ.विचारे,ममासच्या मुख्याध्यापिका कु. श्रद्धा आंब्रे यांनी केले.अध्यक्ष श्री.विक्रांतजी आंब्रे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डाऊ केमिकल्स लोटेचे श्री.विनायक वैद्य,गणित तज्ञ व प्राध्यापक श्री.संजय मोरे उपस्थित होते.प्रशालेतील दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेविषयी वाटणारी कृतज्ञता व्यक्त केली.शाळेला निरोप देताना वाटणारे दुख प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोळ्यात दिसून येत होते. “माझी शाळा,माझी आई” हे शाळेचे बोधवाक्य आम्ही कायम लक्षात ठेऊ असे मत कुमारी श्रद्धा पांचाळ हिने मांडले.अक्षय शिंदे,वैष्णवी शिंदे,दिपाली खोपकर यांनी मनोगते व्यक्त केली.प्रशालेतील नववीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप व शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे श्री.विनायक वैद्य साहेब यांनी आपल्या भाषणातून शाळेविषयी बोलताना सांगितले की गुणदे शाळेच्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक करत “संस्कारांची पेरणी अन् जोपासना करणारी शाळा आहे.पैसा क्षणिक असतो पण संस्कार चिरंतन असतात अन् ते एका दिवसात कोणावर करता येत नसतात.त्यासाठी मेहनत बालपणापासून लागते ती मेहनत ही शाळा घेते आहे. विद्यार्थ्यांना ‘वय वादळ विजांच’पुस्तक हे आपले गुरु,व्यायामाचे महत्व, स्पर्धा परीक्षेविषयी माहिती सांगितली व शुभेच्छा दिल्या.त्यानंतर संस्थेचे सहसचिव राजेंद्र आंब्रे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर,थोर शास्त्रज्ञ एडिसन,धीरूभाई अंबानी यांची उदाहरणे दिली.योग्य अभ्यासाची दिशा त्यांनी पटवून सांगितली.गणित तज्ञ व प्राध्यापक श्री.संजय मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की यश मिळविण्यासाठी सातत्य, जिद्द, चिकाटी, मेहनत महत्वाची आहे.
संस्थेचे अध्यक्ष श्री.विक्रांतजी आंब्रे यांनी बोलताना सांगितले की निघा,रोशन व्हा,परतून पहा,आपल्या शाळेला कधी विसरू नका असे मोलाचे मार्गदर्शन केले. “आमची संस्था सेमी माध्यमातील शिक्षण देत असली तरी आमच्या संस्थेची मुळे भारतीय संस्कृतीशी घट्टपणे एकरूप झालेली आहेत. दहावीचे विद्यार्थी अंतिम परीक्षेला सामोरे जाताना सर्व शाळा निरोप समारंभ आयोजित करतात पण आम्ही विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा समारंभ आयोजित करतो कारण विद्यार्थी दहावीची परीक्षा जरी उत्तीर्ण झाले तरी शाळेशी त्यांची नाळ कायमची जोडलेली असते. त्यामुळे आम्ही निरोप समारंभ नव्हे तर शुभेच्छा समारंभ साजरा केला. विद्यार्थ्यांच्या उज्जवल भविष्यासाठी त्यांच्या गुरुजनांसोबत आई – वडिलांचा आशीर्वाद असणे आवश्यक आहे. सन्मानीय संचालक श्री.संजयजी आंब्रे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की १००% निकालाची परंपरा कायम ठेवा व प्रशालेचे नाव उज्ज्वल करा.सदगुरू काडसिद्धेश्वर विद्यालय गुणदे प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.अश्विनी जोशी,गुरुकुल विद्यामंदिर गुणदेच्या मुख्याध्यापिका सौ.विचारे,ममासच्या मुख्याध्यापिका कु. श्रद्धा आंब्रे,उपशिक्षक श्री.कदम एम.एम.यांनी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमप्रसंगी वरिष्ठ लिपिक श्री.दीपक पेढांबकर,कनिष्ठ लिपिक येरुणकर पालक वर्ग, विद्यार्थी, ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी नागरिक सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु.हर्षद पेढांबकर,कु.सानिया कांबळे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन श्री.देवकर व इयत्ता नववीच्या सर्व विद्यार्थ्यांनी केले.
चिपळूण :- मयुर मंगेश कदम