पुणे दि ०१ :- यशवंत घाडगेनगर रेंज हिल रोड येथील नजरचुकीने उघड्या असलेल्या बंगल्याचे दरवाजातुन बेडरूम मध्ये प्रवेश करून ,अज्ञात चोरट्याने घरातील २ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज लांबविला. दरम्यान, चतुर्श्रुंगी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाला पाचारण केले आहे. फिर्यादी शाम परूळेकर , वय – ५४ वर्षे , रा . घाडगेनगर , पुणे असे घर मालकाचे नाव आहे. घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत ही चोरीची घटना घडली आहे.
दि. २८ फेब्रुवारी यशवंत घाडगेनगर रेंज हिल रोड , पुणे यांचा राहता फ्लॅट नजरचुकीने उघड्या असलेल्या बंगल्याचे दरवाजातुन बेडरूम मध्ये प्रवेश करून बेडरूम मधी चोरी झाल्याचे निदर्शनास आल्याने शाम परूळेकर , घरात जाऊन सर्व साहित्य सुरक्षित आहे का. याची पाहणी केली. यावेळी त्यांना घरातील बेडरूम मधील कपाटातील १० हजार कॅश व सोन्याचे दागिने असा एकुण २ लाख ७० हजार गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
त्यांनतर शाम परूळेकर यांनी तात्काळ याबाबतची खबर पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व पाहणी केली. चतुर्श्रुंगी पोलिसांनी याबाबत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसणा – या अनोळखी चोरट्याला पकडण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. व पुढील तपास पो.उप.निरी.मोहन जाधव करीत आहे