पुणे,दि ०३: – पिस्तूल बाळगणार्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक पोलीस स्टेशन राजगड हद्दीत अभिलेखावरील पाहिजे, फरारी आरोपिंचा शोध घेत असताना “शिवतारवाडी- मोरदरी येथील स्मशानभूमी समोर असणारे बसस्टॉपवर इसम नामे-अखिलेश उर्फ गोट्या राजेंद्र खाटपे , वय- 25 वर्ष , रा.मोरदरी-शिवतारवाडी पो.कल्याण ता. हवेली जि. पुणे आरोपीला पथकाने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. त्याला राजगड
परिसरात पकडण्यात आले आहे. अखिलेश उर्फ गोट्या राजेंद्र खाटपे आरोपी ला अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाहिजे आरोपी व सराईतांची माहिती काढून त्यांना जेरबंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.त्यादरम्यान, एलसीबीचे पथक राजगड परिसरात माहिती घेत होते. त्यावेळी पोलिसांना शिवतारवाडी- मोरदरी येथील स्मशानभूमी समोर असणारे बसस्टॉपवर अखिलेश हा पिस्तूल घेऊन उभा असल्याची
माहिती मिळाली.त्याचे कब्जात गावठी पिस्तोल बाळगून फिरत आहे ” अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पथकाने सदर ठिकाणी जाऊन सदर इसमास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव अखिलेश उर्फ गोट्या राजेंद्र खाटपे सांगितल्याने त्याची अंगझडती घेतली असता अंगझडतीत मागील बाजूस कमरेलगत पॅन्ट मध्ये खोचलेले अवस्थेत एक गावठी पिस्तोल व त्यातील मॅगझीन मध्ये एक जिवंत काडतूस मिळून आल्याने त्यास मुद्देमालासह ताब्यात घेऊन सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून वरील वर्णनाच्या मुद्देमालासह पो.स्टे. राजगड येथे हजर करत आहोत . सदरची कामगिरी स्थागुशा चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट सो. यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि रामेश्वर धोंडगे ,सफौ. दत्तात्रय जगताप , पोहवा/1684 राजेंद्र चंदनशिव, पोहवा/ प्रमोद नवले पोशी/2411 अमोल शेडगे , पोशी/325 मंगेश भगत, यांनी केली.