शिरूर, दि ०२ :- शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत ६ जुगार अड्ड्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी जुगार अड्डावर छाप्यात ८ जणांना अटक केली आहे व शिरूर येथे जुगार अड्डा सुरु असल्याची गोपनीय माहिती माहिती पोलिसांना मिळाली होती व
शिरूर शहरामध्ये अवैध मटका जुगार चालू आहे अशी माहिती माननीय जयंत मीना सो. (आय पी एस ) अप्पर पोलीस अधीक्षक बारामती यांना बातमीदार मार्फत मिळाली असता त्यांनी बारामती क्राईम ब्रँच चे प्रमुख चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक यांना सांगून त्यांना सदर ठिकाणी रेड करणे बाबत सांगितले असता त्यांनी त्या अनुषंगाने शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतयेथे जाऊन माहिती घेऊन बारामती क्राईम ब्रांच चे पोलीस जवान आणि शिरूर पोलीस स्टेशन चे अधिकारी आणि जवान यांच्यासह अचानक ६ मटक्याच्या अड्ड्यावर छापा टाकला असता सदर ठिकाणी ७ इसम हे कल्याण मटका नावाचा मटका जुगार चालवत होते. नमूद मटका मालक हा agent यांच्याकडून जुगरिच्या आकड्यांवर लोकांकडून पैसे लावून हार जित चा खेळ खेळवून घेत होते. पोलिसांनी आरोपीना ताब्यात घेऊन आरोपी कडून साहित्य जप्त केले-1)79,310/- एकूण रोख रक्कम 2) 00 मटका जुगार घेण्याची साधने-पेन, मटका बुके इ..आरोपी
1) शशी निवृत्ती खांडरे रा. वाडा कॉलनी शिरूर ता. शिरूर जि. पुणे (मटका मालक)2) संदीप विठ्ठल जाधव रा लाटेआळी.शिरूर
3) गणेश नामदेव माने रा . ढोर आळी शिरूर4) चंद्रकांत अमृतराव गवारले रा. पवार माढा शिरूर5) तोसिफ नजीर इनामदार रा पाबळ ता शिरूर 6) मोहिनुद्दीन गुलाम हुसेन काजी रा. कुंभार आळी शिरूर 7) सुभाष ओंकार भोंगळा रा इंदिरानगर शिरूर 8) बाळू मूलचंद शर्मा रा भाजीबाजार शिरूर
एकूण 8 आरोपींविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी माननीय संदीप पाटील सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण. जयंत मीना सो, (आयपीएस) अप्पर पोलीस, अधीक्षक बारामती विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँच चे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,सपोनि सचिन शिंदे बारामती शहर पोलीस स्टेशन सपोनि सागर पाटील, शिरूर पो स्टे, क्राईम ब्रँच बारामतीचे पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे, तसेच आरसीपी पथकातील 7 पुरुष 2 महिला जवान पोलिस जवान यांनी तसेच-शिरूर चे पोलीस जवान वैभव मोरे, अमित खडूस, आदींनी कारवाई केली