मुंबई दि ०७ : – येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या मुंबईतील निवासस्थानी छापा टाकण्यात आला आहे. अंमलबजवाणी संचालनालय अर्थात ईडीने ही कारवाई केली असून, कागदपत्रांची तपासणी केली जात असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबईतील वरळी परिसरात राणा कपूर यांचे निवासस्थान आहे. तेथे ईडीने छापा टाकल्याची माहिती मिळाली आहे.