पुणे दि २२ :- कोरोना विषाणूशी प्रभावीपणे सामोरे जाण्याच्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून ३१ मार्च २०२० पर्यंत सर्व प्रकारच्या रेल्वे सेवा बंद केल्या गेल्या आहेत. या अनुषंगाने हे स्पष्ट केले आहे की ३१ मार्चपर्यंत पुणे विभागातील सर्व आरक्षण कार्यालये, अनारक्षित तिकिटे कार्यालये आणि पार्सल कार्यालयेही बंद राहतील. तिकिट आरक्षणासाठी ऑनलाईन तिकिट बुकिंगची सुविधा आयआरसीटीसी वेबसाइटवर उपलब्ध आहे जिथून प्रवासी या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
या व्यतिरिक्त रद्द केलेल्या रेल्वे तिकिटे २१ जून २०२० पर्यंत परत करण्यात येतील. यामुळे प्रवाशांना त्रास होणार नाही. प्रवासी त्यांच्या सोयीनुसार योग्य वेळी ३१ मार्च २०२० नंतर तिकिटांचा पुढील घेऊ शकतात.