पुणे दि ३० :- लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर पुणे ग्रामीण पोलीसांची दारूची वाहतुकीवर मोठी कारवाई – कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सध्या संचारबंदी लागु करण्यात आली आहे . संपुर्ण देश लॉकडाऊन करण्यात आलेला आहे . तसेच शहरापासुन ते राज्यांपर्यतच्या सर्व सिमा अत्यावश्यक सेवा वगळून वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेल्या आहेत . तसेच सर्व ठिकाणी पोलीसांकडून नाकाबंदी करण्यात आलेली आहे . कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून जनतेला घरातुन बाहेर न पडण्याबाबत वारंवार आवाहन करण्यात येत आहे . परंतु काही लोक आवाहनाला प्रतिसाद पोलिसांना देत नाहीत व कोरोनाचा प्रदर्भाव रोखण्यासाठी आडथळे येत आहेत . तसेच पोलीसांनी दिलेल्या सुचनांकडे दुर्लक्ष करून काही लोक बेकादेशीर वाहतुक करीत आहेत . कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर पुणे ग्रामीण जिल्हयामध्ये आळेफाटा पोलीस ठाणे हददीत नाकाबंदी दरम्यान नाशिक रोडवरुन दोन आयशर ट्रक पुणे च्या बाजुकडे जात असताना पोलीसांनी त्यास थांबविले व विचारपूस केली असता चालकाने सांगितले की , सदर आयशरमध्ये आर्मी कॅन्टींगचा माल आहे . दोन्ही आयशर ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये व्हिस्की कंपनीचे ३६ लाख रुपये किंमतीचे १ हजार दारूचे बॉक्स विनापरवाना वाहतुक करीत असताना पोलिसांना मिळून आले . सदर दोन आयशर ट्रक व १हजार बॉक्स दारूसाठा असा एकुण ७६ लाख किंमतीचा मुददेमाल पोलीसांकडुन जप्त करण्यात आलेला आहे . तसेच खेड पोलीस ठाणे हददीतील डेहणे गावामध्ये नंदु दगडु कोरडे वय – ४९ वर्षे हा बेकायदेशीर बिगरपरवाना वेगवेगळया कंपनीचा दारूचा साठा एकूण ४६ , ४८० / – रू किंमतीचा मुददेमाल बाळगुन व विक्री करत असताना मिळुन आल्याने सदरचा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे . सध्या देशामध्ये अत्यावश्यक सेवा वगळुन इतर सर्व आस्थापना वाहतुक / दारू / बिअरशॉपी बंदचे मा . जिल्हाधिकारी सो , पुणे . यांचे आदेश असताना बेकायदेशीररित्या दारू वाहतुक व विक्री करत असल्याचे मिळुन आल्याने सदरचा एकुण ७६ लाख ४६ हजार ४८० रूपये किंमतीचा मुददेमाल जप्त करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे . पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की , लॉकडाऊन काळामध्ये शासकिय यंत्रणेने दिलेल्या सूचनांचे पालन करावे अन्यथा संबंधीतांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल