पुणे दि ०३: – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी येत्या रविवारी म्हणजेच 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिटे लाइट बंद ठेऊन, मेणबत्ती, फ्लॅशलाइट लावा असे आवाहन केले आहे.देशात कोरोनामुळे पसरलेला अंध:कार दूर करण्यासाठी आपण सर्वांना एकत्र आले पाहिजे.त्यामुळेच आपण सर्वांनी रविवारी रात्री नऊ वाजुन नऊ मिंटानी घरातील सगळे लाइट्स बंद करुन घराच्या दारात किंवा बाल्कनीमध्ये एक दिवा, मेणबत्ती, बॅटरी किंवा मोबाईल फ्लॅशलाइट लावावी अशा शब्दांमध्ये मोदींनी हे आवाहन केले.