पुणे दि ०६ :- सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 116 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 574 कॅम्प असे पुणे विभागात एकुण 690 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 65 हजार 200 स्थलांतरित मजूर असून 1 लाख 19 हजार 480 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.