मुंबई दि ०८ :- महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर नेऊन ठाण्यातील एका तरुणाला मारहाण केल्याचा आरोप केला गेला आहे. भारतीय जनता पक्ष या प्रकरणाचा जाहीर निषेध करतो. सदर प्रकरणी रीतसर चौकशी व्हावी. आणि दोषींवर लवकरात लवकर कारवाई व्हावी सदर प्रकरणातील पीडिऔमत तरुणांकडून नोंदविण्यात आलेली FIR वाचता काही प्रश्न निर्माण होतात.
१ तरुणाच्या घरी जे गणवेशधारी पोलीस गेले होते ते त्या तरुणाला खोटे बोलून मंत्री महोदयांच्या बंगल्यावर का गेले?
२ तरूणाच्या म्हणण्यानुसार बंगल्यावर १० ते १५ इसम पूर्वीच उपस्थित होते म्हणजे कोरोना लॉक डाऊन चे नियम स्वत महाराष्ट्रातील मंत्र्याच्या आशीर्वादानेच धाब्यावर बसवले जात आहेत का?
३ पोलिसाच्या उपस्थितीत मंत्र्याच्या बंगल्यावर लोकांना मारहाण होत असेल तर महाराष्ट्रात गुंडगिरीला शासन प्रशासन अभय देत आहे का?४ त्या तरुणाने मंत्री महोदया विरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिली असेल तर त्यावर कायदेशीर कारवाई व्हावीच पण त्याची वाट न बघता गृहनिर्माण मंत्र्याचे समर्थक म्हणविणाऱ्यानी कायदा हातात घेणे सोयीचे समजले याचा अर्थ महाराष्ट्राच्या मंत्र्याचा आणि त्यांच्या समर्थकांचा महाराष्ट्राच्या गृहखात्यावर आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही का?या प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लवकरात लवकर द्यावीत
मुंबई प्रतिनिधी :- बाळु राऊत