मुंबई दि ०८ :- कोरोना विषाणूचा महाराष्ट्रात वेगाने वाढणारा संसर्ग लक्षात घेता प्रशासन आपल्या परीने शक्य तेवढे प्रयत्न या विषाणूला थांबविण्यासाठी करत आहे. महाराष्ट्रात मुंबईला व पुणे वाचवण्यासाठी महापालिकेने सर्व शक्ती पणाला लावली आहे. कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आणि धोका जास्त असलेल्या सर्व ठिकाणांना सीलबंद केले आहे.परंतु आता महापालिकेने आणखी एक पाऊल उचलले आहे. शहरभरातील कंटेनमेंट झोन अर्थात बचाव करण्याजोगे भाग शोधून काढले आहेत, जेथे खबरदारी घेण्याची जास्त आवश्यकता आहे. हे तेच क्षेत्र आहे जिथे जास्तीत जास्त लोक कोरोना विषाणूग्रस्त रूग्णाच्या संपर्कात आले आहेत आणि जे हाय रिस्क वर आहेत, तसेच होम क्वारंटाईन मध्ये ज्यांना राहण्यास सांगितले गेले आहे व काही भागांसाठी अनेक नियम बनवले आहेत.या नियमांनुसार या भागातील लोक बाहेर जाऊ शकत नाहीत किंवा बाहेरील कोणीही या भागात प्रवेश करू शकत नाही. यासह या कंटेनमेंट झोनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत जेणेकरून या भागांवर बारकाईने नजर ठेवता येईल. या सीसीटीव्हीद्वारे हे निश्चित केले गेले आहे की लोक सर्व नियमांचे योग्य प्रकारे पालन करीत आहेत की नाही आणि पुणे व मुंबई पोलिस त्यावर सतत देखरेख ठेवतात. तसेच आपत्ती नियंत्रण युनिट या सीसीटीव्ही कॅमेर्याच्या फीडवर नजर ठेवेल अशा प्रकारे कोरोनाशी लढण्यासाठी वॉर रूम तयार केला देखील नकाशाद्वारे मुंबईकरांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि या भागांना चिन्हांकित केले आहे जेणेकरुन इतर लोकांनी अनावश्यकपणे या भागास भेट देऊ नये. तसेच या भागात राहणाऱ्या लोकांच्या गरजादेखील सांगितल्या जातात आणि आवश्यक वस्तू त्यांच्या घरी पोचवल्या जातात. एकंदरीत, बीएमसी आणि मुंबई व पुणे पोलिस आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत भारतातही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या भारतात ५३५६ हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मृत्यूची संख्या १६० वर’ व सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात असल्याची माहिती समोर आली आहे.महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या १०१८ महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ६४ झाली आहे तर कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या मुंबई ६४२, पुणे १५९ सांगली २६ अहमदनगर २६ नागपुर २० बुलडाणा ७ ठाणे ८७ येवतमाळ ४ सातारा ५ कोल्हापुर २ रत्नगिरी ३ नाशिक २ जळगांव २ गोंदिया १ औरंगाबाद १३ कोरोना बाधितांची संख्या झाली आहे तर मृत्यूची संख्या ६४ झाली आहे आहे. कोरोनाग्रस्त आहेत. महाराष्ट्रासह देशभरात लॉकडाऊन आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्व प्रकारची खबरदारी घेतली जाते आहे. ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळतात, तो भाग सील केला जात आहे.