पुणे दि.25 : – कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालय, दिल्ली यांचे दिनांक 24 एप्रिल 2020 रोजीच्या परिपत्रकानुसार लॉकडाऊन कालावधीत दुकाने चालू ठेवण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यानंतर नव्याने प्रसिध्दीस दिलेल्या प्रेसनोटद्वारे नमूद सवलती राज्य शासनाने जाहीर केलेल्या कोरोना संक्रमणशील क्षेत्रात लागू होणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे.
पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने राज्य शासनाने पुणे शहराचा समावेश रेड झोनमध्ये म्हणजेच संक्रमणशील क्षेत्रात केलेला आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने दुकाने चालू ठेवण्याबाबत जाहीर केलेले परिपत्रक पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात लागू नसून यापूर्वी अंमलात असलेले सर्व मनाई आदेश पुढील काळात कायम राहतील, याची नोंद घ्यावी असे पुणे शहर पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी कळविले आहे.