मुंबई दि २६ :- कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव असल्या कारणाने देशात सगळीकडे लॉक डाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे छोटे मोठे अनेक व्यवसाय बंद आहेत. शिवाय कंपन्या देखील बंद आहेत. सरकारने आव्हान केल्यामुळे बहुतांश लोक वर्क टू होम करत आहेत. अनेक व्यावसायिकांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अॅप्सची मदत घेतली आहे. अल्पावधीत खूप लोकप्रिय झालेल्या झूम अॅप चा वापर खूप मोठ्या प्रमाणात करण्यात आला. परंतु काही दिवसांपूर्वी सुरक्षा आणि गोपनीयतेबाबत प्रश्न उभा असल्या कारणाने भारत सरकारने अलीकडेच काही विभाग आणि कर्मचार्यांसाठी झूमच्या वापरावर ‘बंदी’ घातली आहे. लॉकडाउनमध्ये झूम अॅप प्रचंड लोकप्रिय झाले आहे त्यामुळे आता त्याला टक्कर देण्यासाठी फेसबुकने नवीन फीचर आणलं आहे. फेसबुकने एक नवीन व्हिडिओ चॅटिंग फीचर मॅसेजर रूम्स (‘Messenger Rooms) ’ लॉच केले आहे यात एकाचवेळी 50 जणांना व्हिडिओ कॉल करता येणे शक्य आहे. अशी माहिती फेसबुकने आपल्या ट्विटर वरुण शेअर केली आहे
फेसबुक नवीन फीचर्स विषयी माहिती
सर्वात अल्पावधीत लोकप्रिय झालेले फेसबुक याची स्थापना मार्क झुकेरबर्ग यांनी केंब्रिज, मॅसेच्युसेट्स येथे २००४ साली केली.
24 एप्रिलपासून Messenger Rooms हे फीचर कंपनीने रोलआउट करण्यास सुरूवात केली असून काही दिवसांमध्ये सर्व युजर्सना हे फीचर उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे यात एकाचवेळी 50 लोक सहभागी होऊ शकतील
१) या फीचरद्वारे युजर्स ( वापर करणारे) स्वतः चॅट रूम्स तयार करु शकतील.
२)मेसेंजर रुम्स हे फीचर फेसबुकच्या मेसेंजरमध्ये मिळेल.
३)फेसबुक अकाउंट नसलं तरी युजरव्हिडिओ चॅटिंग रुम जॉइन करु शकतील.
४) या नवीन फीचर्स मध्ये वेळीची मर्यादा अमर्याद असणार आहे.
५)वेळीची मर्यादांचे नियंत्रण मेसेंजर रुम होस्ट करणार्याकडे असेल
६) होस्ट युजर रुम लॉक किंवा अनलॉक करु शकेल.
७) गॅलरी सारख डिझाईन असलेले व्हिडीओ कॉल्स सर्वांच्या पसंतीस उतरत आहे
८) होस्टकडे युजर्सला ज्वाइन करण्याचा तसेच बाहेर काढण्याचा पर्याय असेल.
९)ज्याप्रमाणे फेसबुक मेसेंजरवर ग्रुप बनवला जातो, त्याचप्रमाणे Messenger Rooms क्रिएट करता येईल.
१०) जर तुम्ही या रूम्समध्ये मेसेंजर अॅपद्वारे जोडले गेला तर तुम्ही AR इफेक्टस आणि बॅकग्राउंड्स वापरू शकता
!ही सोय आता काही देशात उपलब्ध करून देण्यात आली असून टप्प्या टप्प्याने सगळीकडे देण्यात येईल.
रूम्स होस्ट करण्याची सोय लवकरच इंस्टाग्रामवरही येणार आहे!
व्हॉट्सअॅप या प्रसिद्ध मेसेजिंग अॅपवरून व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलच्या ग्रुपची मर्यादा ४ वरून आता ८ करण्यात आली आहे झुम, गूगल मीट, ड्युओ, स्काईप, मायक्रोसॉफ्ट टीम्स सारख्या अॅप्सनी वाढवलेल्या मर्यादेमुळे आता व्हॉट्सअॅपही त्यांची मर्यादा ४ वरून ८ वर केली आहे. ही नवी मर्यादा व्हॉईस व व्हिडीओ दोन्ही प्रकारच्या कॉल्ससाठी लागू असेल.
New Live Video Features for Facebook, Instagram and Portal : Live With ची सोय परत आणण्यात आली असून यामुळे आणखी एका व्यक्तीसोबत तुम्ही फेसबुकवर लाईव्ह करू शकाल! ऑनलाइन इवेंट्स आता ऑनलाईन ओन्ली असे मार्क करता येतील. लाईव्ह व्हिडीओसाठी पैसे घेण्याचीही सोय देण्यात येणार असून यामुळे जो व्यक्ती लाईव्ह करत असेल तो त्याच्या viewers कडून त्याच्या कन्टेन्टसाठी पैसे आकारू शकतो! यामुळे अनेक शिक्षक किंवा ऑनलाईन व्हिडीओ क्रिएअर्सना उत्पन्न मिळवता येईल! संस्थांसाठी निधी उभारण्यासाठी डोनेट बटन सुद्धा जोडू शकता
इंस्टाग्रामच्या डेस्कटॉप वेबसाईटवरूनही आता लाईव्ह व्हिडीओ पाहता येतील आणि त्यावर कमेंट्ससुद्धा करता येतील!Messenger Kids ही लहान मुलांसाठीची मेसेजिंग सेवा आता सर्वत्र उपलब्ध होत आहे याद्वारे पालकांना त्यांच्या मुलांच्या व्हिडीओ कॉल्सवर नियंत्रण ठेवता येईल.फेसबुक डेटिंगमध्ये आता Virtual Dates तयार करता येतील! यामुळे लोक एकमेकांना व्हर्च्युअल डेट्सवर इनव्हाईट करू शकतील!