पुणे दि ०१ :- पुणे शहरात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने दोन भीषण घटना घडल्या आहेत. मंगळवार पेठेत इमारतीवर उभारलेला टॉवर आणि संचेती ब्रिज जवळील होर्डिंग रस्त्यावर कोसळले.व लॉक कोरोना विषाणूमुळे राज्यात संचारबंदी आहे. त्यामुळे कोणालाही बाहेर पडता येत नाही. त्यामुळे गर्दीने भरलेली रस्ते सुमसाम आहेत. दरम्यान आज अचानक सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्यानंतर अचानक मंगळवार पेठ येथील सदाआनंद नगर भागातील एका इमारतीवर मोबाईल टॉवर कोसळला. सुदैवाने तो सांगाडा तुटला नाही. तो लोमकळत इमरतीवरच राहिला आहे. त्यामुळे कोणतेही दुर्घटना घडली नाही. तर संचेती चौकात लावलेले मोठे होर्डिंग रस्त्यावर कोसळले. ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला पडले. त्यामुळे काही वेळेसाठी रास्ता बंद झाला होता
तर शहरात कहाणी भागात झाडपड्डीच्या 50 हुन अधिक घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी रस्त्यावर झाडे कोसळली आहेत. यात देखील कुठे काही दुर्घटना घडलेली नाही.मोबाईलचे टॉवर आणि संचेती चौकातील होर्डिंग काढण्याचे काम सुरू आहे. पालिकेच्या विभागाला कळवले असून त्याचे काम काढण्याचे सुरू करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.आहेत