वैजापुर दि २३ :-वैजापुर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष केंद्रित केले असुन वैजापुर तालुका कोरोना मुक्त व्हावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. २४ जुलै दुपारी १ वाजेपासून ते ३१ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत पुर्णपणे १०० टक्के लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. याकाळात कुणीही शहरात येऊ नये व शहरातुन बाहेर जाऊ नये असे आवाहन प्रशासना कडुन करण्यात आले आहे.आज वैजापूर येथे आमदार प्राचार्य रमेश पा बोरनारे सर यांनी गायकवाडवाडी येथील कोव्हिड सेंटरला भेट दिली व रुग्ण नागरिकांना फळे वाटप केली. वैद्यकीय अधिकारी डॉ गजानन तारपे, डॉ.इंदुरकर यांच्याशी कोव्हिड केअर सेंटर मधील रुग्णा संबंधीत विचारणा करून आढावा घेतला. तसेच तेथील नागरिकांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पा जगताप ,महेश पा बुनगे, अमोल पा बोरनारे आदी उपस्थित होते.
वैजापुर तालुका प्रतिनिधी गणेश ढेंबरे