पोलीस आयुक्त कार्यालयातील गुन्हेशाखेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन
वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचायांशी साधला संवाद
सेवा कार्यप्रणाली साठी पुणे शहर पोलीसांचे अभिनंदन
पुुणे दि ०१ :- कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊन कालावधीत पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांबाबत माहीती घेण्यासाठी मा.पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य श्री.सुबोधकुमार जायस्वाल यांनी आज दिनांक 01/08/2020 रोजी 16.30 वा. पोलीस आयुक्त कार्यालय पुणे शहर येथे भेट दिली.सदर वेळी त्यांनी पोलीस आयुक्त येथे .डॉ.के.व्यंकटेशम, पोलीस आयुक्त,पुणे शहर, यांच्या संकल्पनेतुन कार्यरत असलेल्या सेवा कार्यप्रणाली येथे भेट दिली. सेवा कार्यप्रणाली येथील कार्यपध्दती व तेथील सर्व माहीती पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी दिली. मा.पोलीस महासंचालक सो यांनी पुणे शहर पोलीस यांनी सुरु केलेल्या या उपक्रमा बद्दल अभिनंदन करुन सदरचा उपक्रम महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हयात सुरु करावा जेणे करुन पोलीस दलाची प्रतिमा उंच करता येईल असे मत मांडुन त्यांनी मा.पोलीस आयुक्त,पुणे शहर व त्यांचे सेवा कार्यप्रणाली टिमला पुढील कामाकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यानंतर मा.पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य .सुबोधकुमार जायस्वाल यांनी पोलीस आयुक्त कार्यालयातील गुन्हेशाखेचे नविन इमारतीचे उद्घाटन केलेे. सदर उद्घाटनाचे कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता तेली, डिव्हीजनल इंजिनियर .राठोड तसेच ज्युनियर इंजिनियर श्री संतोष कलकुटे यांनी इमारतीचे बांधकामास मोलाचे सहकार्य केले असल्याने त्यांचा पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला आहे.सदर वेळी पोलीस उपआयुक्त श्रीमती स्वप्ना गोरे यांनी त्यांना बिल्डींगचे रचनेबाबत माहिती दिली तसेच पोलीस उपआयुक्त बच्चनसिंग यांनी पुर्ण बिल्डींग दाखवुन तेथील कार्यरत सर्व विभाग दाखविले.
त्यानंतर पोलीस आयुक्त कार्यालय येथील कॉप्स अॅक्सलन्स हॉल याठिकाणी मा.पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य .सुबोधकुमार जायस्वाल यांनी वरिष्ठ पोलीस अधिकायांशी संवाद साधून अडीअडचणी जाणून घेतल्या लॉक डाऊन कालावधीत उत्कृष्ट काम करणारे पुणे शहर पोलीस दलातील पोलीसांनी केलेल्या चांगल्या कामगिरीच्या माहिती फलकांची पाहणी केली. त्याचवेळी त्यांचे हस्ते फील द बिट स्टोरी बनविणारे श्री.संजय सयानी यांचाही प्रंशसापत्र व पुस्तक देवून सत्कार करण्यात आला कोरोनाचा कालावधीत उत्कृष्ट काम केल्याबद्दल पूणे शहर पोलिसांच्या कामाचे कौतुक करुन सुरु केलेल्या सेवा,क्रीप्स,डिजीटल चार्जशीट,एक्ट्रा अॅप इत्यादी विविध योजनांचे कौतुक केले. तसेच कोअर पोलीसींग करणेबाबत सुचना देवून गुन्हे नियंत्रण,गुन्हे डिटेक्शन याचेवर मिटींगमध्ये भर दिला या कालावधीत काम करताना महाराष्ट्र पोलीस दलातील 100 जवान मयत झालेबाबत सांगुन पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांचे फिजीकल फिटनेस वाढवणे बाबत आवाहन केले
सदर वेळी मा.पोलीस आयुक्त डॉ. के वेंकटेशम पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व स्थलांतरित मजुरांसाठीचे काम, सोशल पोलिसिंग सेल, प्रवासी डिजीटल पास बाबत,सोशल मीडिया चित्रफिती बाबत व जनजागृती पुस्तिकांबद्दल, पोलीस कल्याणकारी योजनांबाबत, क्वारंटाईन व ड्रोन द्वारे नियंत्रण बाबत वगैरे कोविड 19 कालावधती सुरु केलेल्या उपक्रमांची माहिती दिली. पोलीस उपायुक्त श्री बच्चन सिंग यांनी सदर वेळी वरील विविध उपक्रमांबाबत स्वत: तयार केलेले मुद्दे निहाय माहिती (द्रद्रद्य) सादर केले .
सदर वेळी .पोलीस सह आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे , अपर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, श्री.अशोक मोराळे, डॉ संजय शिंदे पो पोलीस उपायुक्त श्री. वीरेंद्र मिश्र,.पंकज देशमुख,. प्रसाद अक्कांनवरू, संभाजी कदम. मितेश घट्टे, श्रीमती पोर्णिमा गायकवाड,सुहास वावचे हे हजर होते.