पुणे दि ०५ :- एका पुणे औंध परिसरात राहणारे ५३ वर्षाच्या महिलेच्या मोबाईलवर केवायसी अपडेट करण्याचा मेसेज आला होता. व अपडेट न केल्यास पेटीयम बंद होईल, असे सांगण्यात आले. यातील फिर्यादी हे त्यांचे राहते घरी असताना सकाळी ११/४० वा . त्यांना VM – MOHDSM यावरून मॅसेज आला , त्या मॅसेजमध्ये तुमचे पेटीएमचे केवायसी एक्स्पायर झाले आहे , २४ तासाच्या आत अपडेट नाही केले तर तुमचे पेटीएम बंद होईल . त्यासाठी ७९ ०८८१५७४२ यावर फोन करा असे लिहीले होते . तो मॅसेज वाचून फिर्यादी यांनी ७९०८८१५७४२ यावर फोन केला असता , त्यावर बोलणा – या अनोळखी इसमाने फिर्यादीस त्यांचे पेटीएम चालु ठेवण्यासाठी गुगल क्रोमवर जावून क्विक सपोर्टला क्लिक करून माहीती भरणेस सांगून फिर्यादीचे खात्यातुन पैसे ट्रान्स्फर करणेस सांगून , फिर्यादी यांने ट्रान्स्फर केलेले पैसे चार वेळा परत करून , फिर्यादी यांचा पूर्ण पैसे परत मिळतील असा विश्वास देवून सदरचे पैसे परत न करता फिर्यादी यांचे अकाऊंटवरून एकूण १, लाख ८०,हजार ३१३ / – रू.घेवून त्यातील ९६,हजार ५०० / -रू . फिर्यादी यांचे खात्यावर परत करून , ऊर्वरीत ८४,हजार ३१३ / -रू . परत न करता फिर्यादी यांची फसवणुक केली आहे या प्रकरणाचा तपास चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक माया देवरे पुढील तपास करत आहेत.