पुणे दि ०९ :- हडपसर परिसरात मांजरी येथील एटीएम मशिनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर चिखल किंवा स्प्रे मारून मशीन उचकटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पण एकाला पकडण्यात यश आले आहे.राहूल माणिक तुपेरे (वय ३०, रा. कुंजीरवस्ती, मांजरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई आकाश गायकवाड यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई आकाश गायकवाड आणि कांबळे दिनांक ८ रोजी ३ वा मांजरी परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी एचडीएफसी बँकेने मांजरी परिसरातील बँकेच्या एटीएम मशीनची कोणीतरी उघडण्याचा प्रयत्न करत आहे आशी माहिती फोन करून कळविली व हडपसर पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस शिपाई गायकवाड आणि कांबळे घटनास्थळी दाखल झाले.व सदर ठिकाणी जाऊन पोलिसांनी शोध घेतला असता . घुले शाळेजवळ मांजरी पुणे येथील एटीएम मध्ये यातील नमुद इसम- राहुल तुपेरे हा एटीएम चे सीसी टीव्ही कॅमे – यावर चिखल लावुन , एटीएम चे सायरन तोडुन , मशीनचे दरवाजा तोडुन मशीन उघडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळुन आला आहे व पुढील तपास पो.हवा.लोखंडे करीत आहे