पिंपरी चिंचवड दि १३ :-पिंपरी चिंचवड परिसरातील वाल्हेकरवाडी येथील लक्ष्मीनगर येथील एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे व त्याच्याकडून १० लाख १५ हजार ६०५ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये २० किलो ५९५ ग्राम वजनाचा गांजा आणि एका कारचा समावेश आहे.अल्लाबक्ष नजीर शेख (वय २६, रा. महात्मा गांधी कुष्ठ धाम, सारोळा रोड, ता. लातूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक शाकीर गौस मोहद्दिन जिनेडी यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ विरोधी पथकाला गोपनीय माहिती बुधवारी दुपारी माहिती मिळाली की, वाल्हेकरवाडीमधील लक्ष्मीनगर येथे एक तरुण गांजा विक्रीसाठी आला आहे.त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून आरोपी शेख याला कारसह ताब्यात घेतले.त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ४ लाख १४ हजार ८७५ रुपये किमतीचा २० किलो ५९५ ग्राम वजनाचा गांजा सापडला.पोलिसांनी आरोपी कडून गांजा व कार असा एकूण १० लाख १५ हजार ६०५ रुपयांचा ऐवज जप्त केले आहे आरोपी शेख याला अटक केली.चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.