पुणे दि १९ : – पुणे वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात 16 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी खासगी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी धनंजय अधिकारी या खासगी व्यक्तीवर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील तक्रारदार यांचे किरकोळ कारणावरून भाडन झाले होते. याबाबत त्यांच्याविरोधात अदखलपात्र (एन.सी) गुन्हा दाखल आहे. त्यावेळी खासगी व्यक्ती धनंजय अधिकारी याने सुरुवातीला तक्रारदार यांच्याकडे पोलिसांसाठी 25 हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तडजोडीअंती 16 हजार रुपयांची लाच मागितली.
याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. एसीबीने याची पडताळणी केली असता त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार धनंजय यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान धनंजय अधिकारी नेमका कोणत्या पोलिसांसाठी लाच मागत होता. तसेच त्याने यापूर्वीही असे प्रकार केले आहेत असा प्रश्न उपस्थित झाला आहे. व लाच मागणीचा गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्हयाचा तपास श्रीमती प्रतिभा शेंडगे , सहायक पोलीस आयुक्त , ला.प्र.वि.पुणे युनिट या करत आहेत . सदरची कारवाई मा . पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे व अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील , यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली . शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमुद 1068 क्रमांकावर सपंर्क साधण्याचे आवाहन राजेश बनसोडे , पोलीस उप – आयुक्त / पोलीस अधीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले आहे