पुणे ग्रामीण दि ०३ : – पुणे शिरूर परिसरात एका मंडल अधिकाऱ्यास 15 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. वाळू चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच त्या संबंधित कारवाई न करण्यासाठी लाच घेतली आहे.अमोल निवृत्तीनाथ जाधव (वय 40) असे पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अमोल हे तहसील कार्यालयात शिरूर तालुक्यातील पाबळ विभागाचे मंडल अधिकारी आहेत. यादरम्यान यातील 25 वर्षीय तक्रारदार यांची वाळू बाबत तक्रार होती.त्यावेळी अमोल यांनी तक्रारदार यांना वाळू चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच त्या संबंधित कारवाई न करण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत त्यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मगितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज दुपारी अमोल याना तडजोडीअंती तक्रारदार यांच्याकडून 15 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.असून त्याचेविरूद्ध शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे . सदरची कारवाई मा . पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे व अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील , यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली . शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास १०६८ क्रमांकावर सपंर्क साधण्याचे आवाहन राजेश बनसोडे , पोलीस उप – आयुक्त / पोलीस अधीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले आहे .