रिटायर्ड एसीपी भानुप्रताप बर्गे यांनी ही उपोषण स्थळाला दिली भेट.
पुरंदर किल्याच्या पायथ्याला जय भवानी जय शिवाजी चा जयघोष..
पुणे दि ०६ :-बिडीला दिलेले छत्रपती संभाजी महाराज यांचे नावं हटवण्यासाठी शिवधर्म फाउंडेशन चे चालू असलेले आमरण उपोषणाला धार चढली असून राज्यातील शेकडो संघटना पाठींबा देण्यासाठी सरसावल्या आहेत…
मराठा आरक्षण समितीचे समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी लागलीच संभाजी बिडीचे नावं बदलले नाही तर कंपनीच्या व्यवस्थापना धडा शिकवला जाईल असा इशारा दिला आहे…मराठा आरक्षण कृती समिती, आखिल भारतीय मराठा सेवा संघ, शिवसेनेचे नेते कुलदीप कोंडे, सारथी वाहतूक आघाडी असोसिएशन, आखिल भारतीय होलार समाज संघटना, राष्ट्रीय विद्यार्थी संघटना शिवशंभू स्वराज्य संघटना, अशा अनेक संघटनांनी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे….
यावेळी मराठा आरक्षण कृती समितीचे समन्वयक रामभाऊ जगताप यांनी कंपनीला कडक इशारा दिला आहे.