पुणे दि ९ : – शहरात दुचाकी चोरी करणाऱ्या दोघा सराईतांना हडपसर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून २ लाख ५५ हजारांच्या १० चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. विष्णू भाऊसाहेब कुंडगिर (वय २१, रा. खेरडा ता उदगीर लातूर) आणि पवन व्यंकट पाटील ( रा निलंगा लातूर ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.शहरात लूटमारीसोबतच वाहन चोरीचे प्रकार सुरू आहेत. या चोरट्यांचा शोध घेणे आणि या घटनांना पायबंद लावण्यासाठी उप निरी सौरभ माने ,पो ना नितीन मुंढे,पो शी प्रशांत टोनपे स्टाफसह हडपसर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जबरी चोरी वाहन चोरी व घरफोडी प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग व गस्त घालत होते. दरम्यान हडपसर यावेळी नाकाबंदीत पोलिसांनी विष्णू व पवनला थांबवून कागदपत्राबाबत विचारणा केली.त्यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना हडपसर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. चौकशीत दोघेही रेल्वे पोलीस तसेच हैदराबाद पोलीसांच्या रेकॉडवरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून २ लाख ५५ हजारांच्या १० दुचाकी जप्त करण्यात आल्या. व सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण सुहास बा वचे पोलीस उपायुक्त परी 5 , कल्याणराव विधाते सा पो आयुक्त हडपसर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मा रमेश साठे वरिष्ठ पो निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन हमराज कुंभार पो नी (गुन्हे) यांचे सूचनेनुसार पो उप निरीक्षक सौरभ माने सा पो फो युसूफ पठाण, पो हवा राजेश नवले , पो ना सैदोबा भोजराव पो ना नितीन मुंढे पो ना गोविंद चिवळे पो शी प्रशांत टोनपे यांचे पथकाने केली