पुुणे ग्र्रा्रा दि २१ :-मीणणपुणे नगर महामार्गाचे वाघोली ते शिक्रापुर पर्यंत सहापदरीकरणाचे काम सध्या जोरात सुरु आहे.परंतु हे काम करत असताना भविष्याच्या दुष्टिने काही गोष्टींचा विचार होणे आवश्यक असताना तो झालेला दिसत नाही. सध्या वाघोली पासून लोणीकंद दोन्ही साईटने रस्त्या रुंदीकरणाचे जे काम प्रगतीपथावर आहे.पंरतु हे काम करत असताना वाघोलीकरांच्या जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा अशा विजेच्या बाबत गांभीर्यतेने घेतलेले दिसत नाही.
या मध्ये वाघोली (खांदवेनगर)पासून लोणीकंद (आळंदी फाटा) पर्यत महावितरणच्या भूमिगत असलेल्या 22 केव्हीच्या केबल (‘वाघेश्वर फिडर व पूर्वरंग फिडर )’स्थलांतरित न करता त्यावर रस्त्यावर बनवण्याचे काम सुरु आहे .तर तुटलेल्या व खराब झालेल्या जागी तेथेच डागडुजी करण्यात येत आहे.त्यामुळे भविष्यात या विद्युत केबल (वाहिनी) खराब झाल्या किंवा त्या केबलचा मेंटेनन्स निघाल्यास महामार्ग खोदणार का ? अशा सवाल वाघोलीतील सुज्ञ नागरिक उपस्थित करत आहेत .तर रस्त्याच्या कडेला असलेले विद्युत खांब देखील रस्त्याच्या एकदम कडेलाच शिफ्ट केले जात आहेत .तुटलेल्या केबल,डीपी बाॕक्स या मध्ये देखील डागडुजी करुन पूर्ववत करताना दिसत आहे.त्यामुळे फक्त कागदोपञी आणि दिखाऊ काम सुरु असल्याचा आरोप नागरिक करत आहेत .विशेष म्हणजे लाइटचे काम होत असताना महावितरणच्या देखरेखे खाली काम होणे गरजेनुसार असताना ते ही होताना दिसत नाही.याबाबत खाजगीत नाव न छापण्याच्याअटिवर काही अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महावितरण’ने कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नाही. तर प्राथमिक माहिती नुसार सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा सोडून विद्युत वाहिनीची नवीन केबल रोड लगत स्थलांतरित करण्यासाठी आदेश असतानाही महावितरण विभाग याकडे लक्ष देत नाही.तर संबंधित काम महावितरणने दिलेल्या इस्टिमेट पेक्षा पस्तीस टक्के वाढीव दराने दिल्याबाबत देखील जोरदार चर्चा सुरु आहे.तर हे काम करताना स्थानिक रोड लगतच्या बाधित शेतकऱ्यांना कोणताही प्रकारचा मोबदला दिला गेला नसल्याने बाधित शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. काही जागा मालक व शेतकऱ्यांनी याबाबतीत आंदोलनही करणार असल्याचे सांगितले आहे