पिंपरी चिंचवड दि ३० : – पुणे पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट ४ हिंजवडी आयटी पार्कमधील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. या मध्ये ४ जणांची सुटका करण्यात आली आहे तर इतर ४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. गणेश कैलास पवार, समीर ऊर्फ राज ऊर्फ तय्यब सय्यद, युसूफ शेख, हिरा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.युनिट ४ चे
गुन्ह वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली होती व.त्यानुसार हिंजवडी परिसरात येळवंडे वस्तीमधील हॉटेल ग्रॅन्ड मन्नत या हॉटेलवर छापा टाकण्यात आला. हॉटेलमधील ४ तरुणींची सुटका करण्यात आली. त्यांना रेस्क्यू फाऊंडेशन, संरक्षण गृह, मोहम्मदवाडी, पुणे येथे पाठवण्यात आले आहे.
आरोपींकडून इंटरनेटवर एस्कॉर्ट सेर्व्हिसेसच्या नावाखाली स्वतःचे व्हॉट्सॲप क्रमांक प्रसारित करण्यात आले होते. त्या क्रमांकावर संपर्क केला असता ते तरुणींचे फोटो पाठवायचे व त्या ठिकाणी सौदा पक्का झाला कि ग्राहकास हॉटेलचा पत्ता देण्यात येत होता अशी माहिती समोर आली आहे. हिंजवडी पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.