• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, July 3, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

कोरोना रुग्‍णांमध्‍ये सकारात्‍मक जीवनशैलीसाठी उपक्रम-जिल्‍हाधिकारी डॉ. देशमुख

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
07/10/2020
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे, दि 07 :- कोविड किंवा कोरोना म्‍हटलं की रुग्‍ण किंवा त्‍याच्‍या नातेवाईकांच्‍या मनात भीती निर्माण होते. वास्‍तविक पहाता कोरोना हा काही जीवघेणा आजार नाही. वेळेवर उपचार घेतले तर कोरोनावर मात करता येऊ शकते. सर्व काळजी, खबरदारी घेतली आणि तरीही कोरोना झाला तर त्‍यावर मात करण्‍यासाठी खंबीर मन करायलाच हवं. कोविड केअर सेंटर मध्‍ये दाखल होण्‍यापासून उपचार होवून ठणठणीतपणे बाहेर पडेपर्यंत रुग्‍ण आणि त्‍यांचे नातेवाईक चिंतेत असतात. या सर्व बाबींची दखल घेऊन जिल्‍हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्‍या निर्देशानुसार कोविड केअर सेंटरमध्‍ये रुग्‍णामध्‍ये सकारात्‍मक जीवनशैलीची अंमलबजावणी करण्‍याबाबत उपाययोजना करण्‍यात येत आहेत.

याच उपक्रमाचा एक भाग म्‍हणून कोरोनाबाधित असताना सकारात्मक विचारशैली कशी ठेवावी, योग, योगाचे फायदे व याबद्दल योग शिक्षक दिलीप गायकवाड यांनी तळेगाव दाभाडे येथील रुग्‍णांना मार्गदर्शन केले. यावेळी योगसाधना वर्ग घेण्‍यात आला. प्रमुख मार्गदर्शक म्‍हणून मावळचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के, मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे, कोविड समन्वयक गुणेश बागडे उपस्थित होते.

तळेगाव दाभाडे (तालुका मावळ) येथील कोविड केअर सेंटरमध्‍ये रुग्णांच्‍या मनात भीतीचे वातावरण निर्माण होवू नये यासाठी नेहमी रुग्णाच्या मनोरंजनाकरिता वेगवेगळे बैठे किंवा मैदानी उपक्रम राबविले जातात. यानुसार अंताक्षरी, रुग्णांच्या आवडीनुसार गीत गायन, संगीतावर नृत्‍य आणि नेहमीप्रमाणे व्यायाम, स्वच्छता करण्यात येते. रोज दुपारी रुग्णांसाठी विविध उपक्रम या केंद्रात घेतले जातात. त्‍यामध्‍ये प्रबोधनपर व उत्साह वाढवणारी व्याख्याने, संगीत खुर्ची स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पास पिलो, गायन, विविध कृती करणे, निबंध स्पर्धा, रुग्‍णांपैकी कुणाचा वाढदिवस असेल तर शुभेच्‍छा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

या मनोरंजनपर उपक्रमांमुळे रुग्‍णांच्‍या आजाराबद्दलची संपूर्ण भीती निघून जाते, रुग्णांचा आजार कधी बरा होतो हे त्यांनाही कळत नाही, मानसिकरित्या ते खूप मजबूत राहतात, बरे होण्‍याचे प्रमाण खूप छान आहे, रुग्ण स्वतः नवीन गोष्टी शिकतो व इतरांना देखील शिकवण्याचा प्रयत्न करतो आणि विशेष म्‍हणजे सर्व नियम, अटी पाळून रुग्ण स्वतः उत्साहाने सहभाग घेतात.

Previous Post

हॉटेल, बार, रेस्टॉरंट चालविताना मार्गदर्शक सूचनांचे पालन करा -जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Next Post

पीक परिस्थिती व कृषी योजनांचा जिल्हाधिका-यांकडून आढावा शेतक-यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी रेशीम शेती, शेततळयांमध्ये मत्स्यपालन, यांत्रिकीकरणावर भर द्या – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Next Post

पीक परिस्थिती व कृषी योजनांचा जिल्हाधिका-यांकडून आढावा शेतक-यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी रेशीम शेती, शेततळयांमध्ये मत्स्यपालन, यांत्रिकीकरणावर भर द्या – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist