पुणे दि १२ :- सध्या कोरोनाच्या महामारीमुळे पुणे शहरात रक्ताची टंचाई जाणवत आहे. अनेक गरजू रुग्णांना रक्ताच्या अपुऱ्या उपलब्धतेमुळे वेगवेगळ्या रक्तपेढ्यांमध्ये फिरावे लागत आहे. काही शस्त्रक्रिया रक्ताच्या तुटवड्यामुळे पुढे ढकलाव्या लागत आहेत. रक्तदान हे महानदान आहे. एका मानवाचेच रक्त दुसऱ्या गरजु मानवाला चालते. आजच्या युगात ते सर्वश्रेष्ठ दान मानले जात आहे. मानवी रक्ताला कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने रक्तदान करणे हा एकमेव पर्याय समाजापुढे आहे. म्हणून हे सर्व आपण कमी करू शकतो केवळ आपल्या व आपल्या मित्र परिवाराच्या रक्तदानानेच.
म्हणूनच काल रविवार दिनांक : ११ ऑक्टोबर २०२० रोजी जय जंगली महाराज प्रतिष्ठानच्या वतीने बाॅलीवुडचा शहेनशाह, सुपरस्टार ऑफ द मिलेनियम मा.श्री.अमिताभ बच्चन यांच्या ७८ व्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचा कार्यक्रम घेण्यात आला होता, सदर कार्यक्रमात ७८ रक्तदात्यांनी रक्तदान केले आणि आमचा संकल्प सिद्धीस नेला, कोरोना रोगाचे संकट असताना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्तदात्यांनी रक्तदान केले म्हणून त्यांचा आणि काही रक्तदात्यांच्या मनात असून देखील B.P. डायबेटीस किंवा हिमोग्लोबिन कमी असल्याने रक्तदान करता आले नाही अशा सर्व माझ्या बांधवांचा मी अत्यंत आभारी आहे असे उद्गार जय जंगली महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष घनश्याम भगवानराव निम्हण यांनी काढले.
यावेळी अविनाश दादा बागवे(नगरसेवक) रमेश पाटील, सागर कमलापूरकर, दीपक ओव्हाळ, संदेश कांबळे, किशोर मारणे, आयोजक घनश्याम निम्हण (अध्यक्ष जय जंगली महाराज प्रतिष्ठान) प्रतिष्ठानचे व काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते