पुणे दि. 5 : पुणे जिल्ह्यामध्ये माहे सप्टेंबर, २०१८ अखेर सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी पडलेला असल्याने,तसेच यापुढील कालावधीमध्ये पावसाची अशाश्वती निर्माण झाल्याने जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई व जनावरांना चारा टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे चाऱ्याची पळवापळवी होऊन त्यातून मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यामध्ये शिल्लक असलेला चारा इतर जिल्ह्यात जाऊ नये व त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी,नवल किशोर राम यांनी पुणे जिल्ह्यातून जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक करु नये यासाठी आदेश निर्गमित केले आहे.सदरचा आदेश, निर्गमित झाल्यापासून दोन महिन्याच्या कालावधी करीता अंमलात राहील, असे कळविले आहे