पिंपरी चिंचवड दि १४ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत आज ‘पिंपरी चिंचवडकरांचा निर्धार – करुया कोरोना हद्दपार’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात झालेल्या या कार्यक्रमास महापौर उषा उर्फ माई ढोरे समवेत उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेवक शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ.वर्षा डांगे, सहाय्यक आयुक्त आण्णा बोदडे, संदिप खोत, स्मिता झगडे, आशादेवी दुरगुडे, सामाजिक कृती दलाचे डॉ.सुभाष साळुंखे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. तसेच याप्रसंगी पिंपरी चिंचवड शहराच्या जडण घडणीचे शिल्पकार अण्णासाहेब मगर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.