पुणे दि १५ :- हुकूमशाही केंद्र सरकार विरूध्द शेतकरी बचाव डिजिटल रॅलीचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार आज महाराष्ट्र राज्यात करण्यात आले. महाराष्ट्रातील कोल्हापूर, संगमनेर, औरंगाबाद, उमरखेड (नागपूर), पालघर, अमरावती या ठिकाणाहून राज्यातील काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी शेतकऱ्यांना संबोधित केले.
केंद्र सरकारने अन्यदात्याचा म्हणजेच शेतकऱ्याचा हे बील आणून विश्वासघात केला आहे. काँग्रेसकडील असलेले सर्व खाती ही शेतकरी व कामगार यांच्या हिताचे निर्णय घेत असून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी आहे. शेतकरी विरोधी कायद्यामध्ये किमान हमीभाव रद्द करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समित्या संपुष्टात आणल्या आहेत. उत्पादनाच्या दिडपट अधिक भाव शेतीमालाला देण्याची मोदींची घोषणा २०१५ मध्येच हवेत विरली आहे. भविष्यामध्ये शेती माल, भाजीपाला, एस. टी. च्या माध्यमातून गावागावात पोहचविण्याचे काम केले जाणार आहे. शेतीबरोबरच शासकीय दराने दूध संकलन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. या रॅलीनंतर महाराष्ट्रातून शेतकऱ्यांच्या २ कोटी सह्या घेऊन केंद्र सरकारला शेतकरी विरोधी कायदा मागे घेण्यासाठी पाठविल्या जाणार आहेत.
काँग्रेस भवन तसेच शहरातील अनेक भागांमध्ये या सर्व रॅलीचे प्रक्षेपण शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून हडपसर विधानसभा मतदार संघात माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, पर्वती विधानसभा मतदार संघात प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, कोथरूड विधानसभा मतदार संघात नगरसेवक चंदूशेठ कदम व विजय खळदकर, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात नगरसेवक अविनाश बागवे, वडगांवशेरी विधानसभा मतदार संघात राजेंद्र शिरसाट व रमेश सकट, ओ.बी.सी. विभागातर्फे साहिल केदारी यांनी वानवडीमध्ये, अल्पसंख्यांक विभागातर्फे यासीन शेख यांनी आझम कॅम्पस येथे, युवक काँग्रेसच्या वतीने विशाल मलके यांनी वडगांवशेरी येथे तसेच मार्केटयार्ड ब्लॉक अध्यक्ष रमेश सोनकांबळे व शैलेंद्र नलावडे यांनी बिबवेवाडी येथे, हडपसरमध्ये शोएब इनामदार यांनी सैय्यदनगरमध्ये, पर्वतीमध्ये महावीर प्रतिष्ठाणमध्ये अविनाश गोतारणे व अनुसया हॉलमध्ये अनुसया गायकवाड व सिमा महाडिक यांनी या डिजीटल रॅलीचे आयोजन केले.