पुणे दि १९ : – पूर्ववैमनस्यातून तरुणावर औंध परिसरात भैरवनाथ मंदिर परिसरात भरवस्तीत कुऱ्हाडीने सपासप वारकरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. व औंध परिसरात घबराटीचे वातावरण तयार झाला आहे व
क्षितिज वैरागर (वय 22, रा. औंध) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.व चतुर्श्रुंगी पोलिसांची टीम गुन्हेगाराच्या शोधात गेलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार, वैरागर व आरोपींमध्ये पूर्वीचे वाद होते. तो औंध गावात राहण्यास आहे. आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास क्षितिज हा औंध भैरोबा मंदिराच्या परिसरात थांबला होता. त्यावेळी आरोपी कुऱ्हाड घेऊन आला. तसेच त्याने क्षितिज याच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करत त्याची हत्या केली. त्यानंतर तो फरार झाला. असून अचानक भर वस्तीत झालेल्या या घटनेमुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. पोलिसांना माहिती मिळताच चतुर्श्रुंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीचा शोध घेण्याचे काम चालू असून काही तासातच अटक होण्याची शक्यता आहे असे पोलिस अधिकारी यांनी आमच्या प्रतिनिधी शी बोलताना सांगितले व चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी करून दाखवले अवघ्या एक तासात आरोपीला नामे अनिकेत दिलीप दीक्षित रा. औंध चतुर्श्रुंगी पोलिसांनी शिताफीने पकडून व पळून पुणे शहर सोडून जाणाऱ्या आरोपीला पकडून उत्कृष्ट चतुर्श्रुंगी पोलिसांनी कामगिरी केली आहे व पुढील तपास चतुर्शिंगी पोलीस स्टेशन करीत आहे