पुणे दि २३ :- पुणे शहर.सामाजिक सुरक्षा विभाग , गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभाग , गुन्हे शाखा पुणे शहर यांचेकडुन ऑनलाइन वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला व आरोपीवर पुणे शहर पोलिसांनी केला पर्दाफाश सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा , पुणे शहर कडील पोलीस उप – निरीक्षक , श्रीधर खडके व पो.कॉ.संतोष भांडवलकर यांना दि .२२ रोजी गोपनीय माहिती मिळाली की , पुणे शहर परिसरात वेबसाईटच्या माध्यमातुन ऑनलाइन एसकॉर्टव्दारे वेश्याव्यवसाय चालु आहे . सदर वेबसाईटवर एसकॉर्ट सर्विस करिता देण्यात आलेल्या नंबर वर बनावट ग्राहकाद्वारे संपर्क साधुन नोवोटेल हॉटेलच्या गेट वर रामवाडी येरवडा येथे वेश्या व्यवसायासाठी पाठविण्यात आलेली एक पिडीत मुलगी मिळुन आली तिला महिला पोलीसांनी ताब्यात घेतले . सदर पिडीत मुलीच्या सांगण्यावरून आणखी एका मुलीची अशा दोन मुलींची सुटका केली आहे . त्यापैकी एक मुलगी नेपाळ व एक मुलगी सिक्कीम येथील आहे . तसेच पो.शि पुष्पेंद्र चव्हाण यांच्या तांत्रिक विश्लेषणा वरून पोलीस उप – निरीक्षक , खडके व स्टाफ यांनी वाकड पुणे येथे जाउन सदर मुलींकडुन वेश्याव्यवसाय करून घेणारे १ ) पवित्रकुमार नागेश्वर महतो २ ) दिलीपकुमार ऊर्फ करण परमेश्वर महतो ३ ) सचिनकुमार वासुदेव मंडल ४ ) अनिलकुमार मेकलाल मंडल चारही आरोपी सध्या रा . फ्लॅट नं .१५ , बी.के.हाईटस् , काळा खडक रोड , वाकड , पुणे मुळगाव , रा.कपका गाव , हजारीबाग , झारखंड यांना ताब्यात घेवुन आरोपी व पिडीत मुलींना पुढील कारवाईकामी येरवडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले असुन आरोपी विरूध्द अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनीयम कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . वरील नमुद कारवाई.पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता , अप्पर पोलीस आयुक्त , गुन्हे .अशोक मोराळे , व पोलीस उप – आयुक्त , गुन्हे श्री.बच्चन सिंग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक , श्रीमती वैशाली चांदगुडे व पोलीस उप – निरीक्षक , श्रीधर खडके यांचेसह सामाजिक सुरक्षा विभागा कडील , पोलीस कर्मचारी पो.हवा.कुमावत , पोना.माने , पोना.पठाण मपोहवा.मोहिते , मपोना पुकाळे , मपोना.शिंदे , पोशि.चव्हाण , पोशि.संतोष भांडवलकर , पोशि.खाडे , चापोशि.गायकवाड यांनी केलेली आहे