मुंबई दि २४:- मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी यासाठी ट्राफिक पोलीस नेहमीच कार्यरत असल्याचं पहायला मिळतं. मात्र, आपले कर्तव्य बजावत असलेल्या एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यावर हात उगारल्याचा प्रकार समोर आला आहे.वाहतुकीचे नियम मोडल्याने कारवाई केलेल्या महिने मनात राग धरून मुंबईत एका ट्रॅफिक हवालदाराला मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाहतुकीचे नियम मोडल्याने कारवाई केलेल्या हवालदाराला एका महिलेने चोप दिला आहे. मुंबईतील काळबादेवी परिसरात ट्रॅफिक हवालदाराने एका महिलेने वाहतुकीचे नियम मोडले म्हणून कारवाई केली. या कारवाईदरम्यान त्या हवालदाराने आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा दावा त्या महिलेने केला आहे. या व्हिडीओत महिला आणि तिच्या साथीदाराकडून वारंवार शिवीगाळ का केली? असा जाब विचारला आहे. त्यानंतर त्या महिलेने या व्हिडीओत हवालदाराची कॉलर पकडत मारहाण केली. तसेच त्या हवालदाराचे कपडेही फाडले. या व्हिडीओत ती महिला त्या हवालदाराला शिवीगाळ करताना दिसत आहे.याप्रकरणी L. T. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला आहे. या महिला आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे