पुणे दि २७ :- पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवैध गांजा वाहतूक करणाऱ्या सरावलेल्या २ आरोपींना अटक त्यांच्या सुमारे 4 लाख 20 हजार रु किमतीचा 28 किलो गांजा तसेच एक चार चाकी कार असा एकूण 8 लाख 20 हजार रुपये चा माल जप्त आज दि २७ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मा पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख सो याजकडून अवैध धंदे यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते .वरील आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नेमण्यात आले होते . या पथकास गोपनीय बातमी दारा मार्फत एक गाडी नं एम एच १२ क्यू ए ४४७९ पांढऱ्या रंगाच्या कार मध्ये अवैध रित्या गांजा वाहतूक होणार असल्याचे सांगितले सदर गोपनीय बातमी ची खात्री करून थेऊर ते नायगाव पेठ मार्गे उरुळी कांचन रेल्वे लाईन पलीकडे रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला व गोपनीय बातमीदाराने संगितले प्रमाणे वरील नंबर ची पांढऱ्या रंगाची कार आलेवर सदर पोलिस पथकाने गाडी ताब्यात घेतली असता सदर गाडीत 2 इसम मिळून आले सदरच्या गाडीत मागच्या डिकी मध्ये पांढऱ्या रंगाचे पोते मिळून आले पोत्यात असलेला पदार्थ गांजा असलेची खात्री झालेवर सदरचे 2 इसम यांचे नाव विचारले असता त्यांनी आपले नाव १) तानाजी शंकर डुकळे वय 29वर्षे रा कोलवडी माळवाडी ता हवेली जि पुणे २) शिवाजी शंकर डुकळे वय वय 31 वर्षे रा कोलवडी माळवाडी ता हवेली जि पुणे यांना ताब्यात घेतले असता सदरचा गांजा विक्री साठी आणला असल्याचे सांगितले सदरच्या आरोपीकडून खलील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे१) एका पांढऱ्या रंगाचे गोणी 28 किलो वजनाचा गांजा नावाचा अंमली पदार्थ किंमत रुपये ४लाख 20 हजार
२) एक पांढऱ्या रंगाची मारुती सुजूकी कंपनीची स्विफ्ट डिझायर नोंदणी क्र एम एच 12 क्यू ए ४४७९ किंमत रुपये 4लाख
असा एकूण ८लाख 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून इन डी पी एस ऍक्ट कलम ८(क) २० (क) नुसार दाखल करण्यात आला असून आरोपी ची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास कामी लोणी काळभोर पोलिस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे .सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख सो अपर पोलिस अधिक्षक विवेक पाटील, हवेली उपविभागीय अधिकारी सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट तसेच पो.उप निरीक्षक शिवाजी ननावरे सहा पो फो दत्तात्रय गिरमकर पो हवा राजेंद्र पुणेकर,पो हवा उमाकांत कुंजीर ,पो हवा महेश गायकवाड,पो हवा निलेश कदम,पो ना विजय कांचन,
पो ना जनार्दन शेळके, पो ना राजू मोमिन, पो कॉ धिरज, जाधव यांनी केली आहे .