पुणे दि ३० : -दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण मानला जातो. यंदाच्या वर्षी सर्व जगावर कोरोनाचे सावट असल्याने, प्रत्येक सण अत्यंत साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. मागील ७ महिने आपण सर्वांनीच कोरोना आणि लॉकडाऊन मुळे आपल्या परिसरातील नागरिकांना घरी बसून काढावे लागल्या असल्याने कित्येक नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. व माझ्या प्रभागातील प्रत्येक कुटुंब हे माझेच कुटुंब असल्याने प्रत्येक घरात दिवाळी साजरी व्हावी यासाठी,सोमेश्वर फाऊंडेशन, मा.आमदार विनायक निम्हण यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक दुर्बल घटकातील दिवाळीनिमित्त गरजू कुटुंबाना 8 हजार कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे किटचे
वाटप करण्यात येनार आहे. यामध्ये साखर १ किलो, रवा १ किलो, मैदा २ किलो, पिठी साखर १ किलो, खोबरं – १/२ किलो, तेल १ लिटर, बेसन पीठ १ किलो, डालडा तूप १ किलो, चकली पिठ – १/२ किलो,भाजके पोहे १ किलो, चिवड मसाला १किलो, इलाईचि – २० ग्रॅम, काजु ५० ग्रॅम, तिळ १०० ग्रॅम, फुटाने डाळ २५० ग्रॅम, शेंगदाणा २५० ग्रॅम, मनुके १०० ग्रॅम, सुगंधी उटणे -१ पॅकेट, मोती साबण १ नग,पणती ५ नग, या सह जवळपास २० वस्तूंचा या किटमध्ये समावेश आहे.दिवाळीनिमित्त. सोमेश्वर फाऊंडेशन,व सनी विनायक निम्हण मित्रपरिवार व मा.आमदार विनायक निम्हण व मा. नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्यातर्फे आपल्या परिसरात किटचे वाटप करण्यात येनार आहे. तसेच दिनांक १/११/२०२० पासून आपल्या भागातीलकाही गोरगरीब नागरिकांना दिवाळीनिमित्त लागणारे वस्तूं किटचे वाटप करण्यात येनार. कोरोना मुळे सर्वत्र लॉकडाउन. या काळात सर्वांनाच घरीच रहावे लागत आहे. परंतु ज्यांचे हातावरचे पोट आहे,अशा व्यक्तींवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सोमेश्वर फाऊंडेशन, मा.आमदार विनायक निम्हण,व विनायक निम्हण मित्रपरिवार मा नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्यातर्फे एक मदतीचा हाथ म्हणून आम्ही हे कार्य करित आहे. माणूसकी हा एकच धर्म समोर ठेवून कार्य केले जात आहे, असे व्यक्तव्य करण्यात आले.व गरजू कुटुंबाची यादी करून या वस्तूंचे वाटप करण्यात येनार आहे. झोपडपट्टीतील कुटुंबाना अधिक प्राधान्य देण्यात येनार.आहे व लॉकडाऊनच्या काळात दिवाळी होईल साजरी प्रत्येक घरी,प्रभागातील प्रत्येक घर माझी जबाबदारी! याची दक्षता घेतली जात आहे. तसेच संदेश ही यावेळी देण्यात आला आहे. या कामाचे सर्व पुणे परिसरातुन स्तरातून कौतुक केले जात आहे
प्रतिनिधी :- संकेत संतोष काळे पुणे