पुणे दि १० : -पुणे विश्रांतवाडी परिसरात सोन्याची चैन व दागिने व वाहन चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्याला फक्त जर्कीन आणि हेल्मेट घालन्याच्या पद्धतीवरून अटक केली आहे. व पुणे शहर परिसरात सीसीटीव्ही तपासले आहेत. त्याच्याकडून 7 लाख 12 हजार 980 रुपये किंमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर चोरीचे सोने घेणाऱ्या सराफाला देखील पकडले आहे.रूपेश प्रकाश यादव (वय ३६, रा. वडगाव शेरी, मूळ-संभाजीनगर) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे. हलीम अलीम शेख (वय ४०, रा. सय्यदनगर, हडपसर ) या सोनाराला पोलिसांनी अटक केले.
विश्रांतवाडीत येथील भाजी मार्केट परिसरात खरेदीसाठी आलेल्या एका महिलेची सोनसाखळी चोरट्याने हिसकावली होती.त्याचा तपास करत असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात आरोपी कैद झाला होता. त्याची माहिती घेत असताना याच आरोपीने चंदननगर, अलंकार, विमाननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरी केल्याचे उघडकीस आले. त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. यावेळी सापळा रचून रूपेशला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने शहरातील विविध भागातून ५ सोनसाखळी आणि ६ वाहने चोरल्याची कबुली दिली. चोरी केलेले सोने तो हलीमला विक्री करीत असल्याचे सांगितले. चोरी करण्यासाठी रूपेश एकाच प्रकारचे
जर्कीनआणि हेल्मेट घालत असल्याची बाब पोलिसांच्या नजरेतून सुटली नाही. कामगिरी पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय चांदखेडे, पोलीस निरीक्षक रवींद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, विजय सावंत, दीपक चव्हाण, यशवंत किर्वे, अझरुद्दीन पठाण, रिहान पठाण, किशोर दुशिंग, उत्तम गट, संदीप देवकाते, शेखर खराडे, अनिकेत भिंगारे, सतीश मुंडे, विशाल गाडे, विनोद महाजन, संजय आढारी, प्रवीण भालचिम, अशोक शेलार यांच्या पथकाने केली आहे.