पुणे दि २२ : – एकमेकांकडे खुन्नसने पाहण्यावरून एका तरुणाचा कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आल्याची घटना हडपसर भागात घडली.होती व हडपसर पोलीस स्टेशनच्या हददीत दि .२१ रोजी रात्री सुमारे १२.३० वा . चे सुमारास ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रासमोर , शेवाळवाडी ग्रामपंचायत मांजरी फार्म , पुणे येथे मुलगा नामे अनिकेत शिवाजी घायतडक वय १९ वर्षे रा . माळवाडी हडपसर पुणे याचा धारधार शस्त्राने वार करुन खुन झाला होता. व हडपसर पो.स्टे . येथे गुन्हा दाखल झाला होता . सदर गुन्हयाचे अनुषंगाने पोलीस उप आयुक्त नम्रता पाटिल सो सपोआ कल्याणराव विधाते सो वपोनि बाळकृष्ण कदम साो , पोनि . ( गुन्हे ) राजु अडागळे साो , यांनी हडपसर पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना बोलावून सुचना व मार्गदर्शन केले . व गुन्हयातील आरोपींचा शोध घेणेसंदर्भात आदेशित केल्याने तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने व तपास पथकातील कर्मचारी यांनी घटनास्थळावरील पुराव्यांच्या अनुषंगाने आरोपीचा शोध घेणे चालु केले . सदर गुन्हयातील आरोपीचा शोध तपासपथकातील अधिकारी व कर्मचारी असे कसोशीने घेत असताना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , ज्यांनी अनिकेत घायतडक याचा खुन झाला आहे ते चार आरोपी कवडीपाट टोलनाकाजवळ , पुणे येथे लपून बसले आहे .अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच सदर ठिकाणी तपास पथकातील अधिकारी सौरभ माने व पोलीस नाईक विनोद शिवले , समीर पांडुळे , पोलीस शिपाई अकबर शेख , शाहिद शेख , प्रशांत टोणपे या टीमने तेथे सापळा लावून आडबाजुस थांबुन पाहणी केली असता ते चार इसम हे कवडीपाट टोलनाक्याजवळ थांबलेले दिसले.तेंव्हा पोलीसांना मिळालेली बातमी खरी असल्याची खात्री झाली . तेंव्हा तपास पथकातील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी त्यांना जागीच पकडुन त्यांचे कडे गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी खुन केल्याची कबुली दिली . इसम नामे १ ) शुभम संजय मोडक वय २० वर्षे रा.मांजरी मोरे वस्ती टकले नगर बालाजी किरणा दुकानाजवळ , ता.हवेली जि.पुणे . २ ) बंटी तानाजी तुपे वय २३ वर्षे रा.माळवाडी आदर्श वसाहत स.नं. १६५ शुभम मेडिकल जवळ ता.हवेली जि.पुणे ३ ) प्रतिक अशोक तांबेकर वय २१ वर्षे रा.हडपसर गाव डांगमाळी ता.हवेली जि.पुणे ४ ) प्रकाश बाळु कांबळे वय २३ वर्षे रा.माळवाडी वीट भट्टी शेजारी हडपसर पुणे या आरोपींना ताब्यात घेवुन दाखल गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे . सदरची कामगिरी महादेव चव्हाण , अप्पर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशिक विभाग पुणे व नम्रता पाटील , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ ५ पुणे शहर , यांचे मागदर्शनाखाली.कल्याणराव विधाते , सहाय्यक पोलीस आयुक्त , हडपसर विभाग पुणे , बाळकृष्ण कदम , वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन , पुणे शहर , पोनि . ( गुन्हे ) राजु अडागळे यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक सौरभ माने , पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे , पोलीस नाईक विनोद शिवले , समीर पांडुळे , संदिप राठोड , पोलीस शिपाई अकबर शेख , शशिकांत नाळे , शाहीद शेख , प्रशांत टोणपे , सचिन जाधव , प्रशांत दुधाळ , उमाकांत स्वामी यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे . सदर गुन्हयाचा पुढील तपास मांजरी पोलीस चौकीचे सहा.पोलीस निरीक्षक मनोज पाटिल हे करित आहेत . ( बाळकृष्ण कदम ) वरिष्ठ पोलीस निरीक्षक , हडपसर पोलीस स्टेशन , पुणे यांनी केली