पुणे, दि. 26 :- (जि. मा. का.) : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या द्ववार्षिक निवडणूक 2020 चा कार्यक्रम घोषित झाला आहे. सदर निवडणुकीचे मतदान मंगळवार दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8 ते सायकांळी 5 पर्यंत होणार असून मतमोजणी गुरूवार दिनांक 3 डिसेंबर 2020 रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी मतदार असलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजाविता येण्यासाठी मतदानाच्या दिवसाची विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्याचे मा. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून निर्देश प्राप्त आहेत. मतदानासाठी देण्यात आलेली रजा ही कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजेव्यतिरिक्त असणार आहे. सदरची रजा महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई कडील शासन निर्णय क्रमांक – विनेर,2011/प्र.क्र.146/का-29 दिनांक 23 जून 2011 अन्वये अनुज्ञेय असणार आहे.