पिंपरी चिंचवड दि २७ : – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत सामाजिक सुरक्षा विभाग यांचे पथकाने पिंपरी परिसरात कल्याण मटका सेंटर या नावाने अवैधरित्या चालु असलेल्या जुगार अड्डयावर छापा . दि २६ रोजी १५:४५ वाजण्याच्या सुमारास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत सामाजिक सुरक्षा विभाग , यांचे पथकाने पिंपरी पोलीस ठाणेचे हद्दीत कल्याण मटका सेंटर या नावाने अवैद्यरित्या चालु असलेल्या जुगाराच्या अड्यावर छापा टाकून जुगार चालवणाऱ्या २ इसमांवर अटक केले आहे व कृष्ण प्रकाश पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये अवैद्य धंद्याबाबत प्रतिबंध करण्याचे अनुषंगाने माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेशीत केलेने होते व सामाजिक सुरक्षा विभाग , पिंपरी चिंचवड यांचे पथक पिंपरी पोलीस ठाणेचे हद्दीत पेट्रोलिंग करित असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार पिंपरी पोलीस ठाणे अंतर्गत , रूम नं . – ३ कै.सुनिल कांबळे चौक , रिव्हर रोड , बौद्धनगर पिंपरी , पुणे . येथे काही इसम अवैद्यरित्या जुगार चालवत असल्याचे समजलेने सामाजिक सुरक्षा विभाग , यांचे पथकाने सदर ठिकाणी जावून जुगाराच्या अड्यावर यशस्वी छापा टाकून १६ हजार ३६० रूपयाचा जप्त करण्यात आला आहे चालक नामे नामे नरेंद्र खटवाणी , रा . बी – ब्लॉक , रुम नंबर -०३ , विजय डॉक्टर गल्ली , पिंपरी पुणे . तसेच , सदर जुगार अड्डा मालक नामे दिनेश मेवाणी , ( पुर्ण नाव माहित नाही ) रा.पिंपरी पुणे यांचे विरुद्ध पिंपरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पिंपरी पोलीस ठाणे करत आहे . सदरची कामगिरी.पोलीस आयुक्त . कृष्ण प्रकाश अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे , पोलीस उप – आयुक्त , गुन्हे . सुधीर हिरेमठ साो , सहायक पोलीस आयुक्त , गुन्हे . आर.आर.पाटील , सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक . विठ्ठल कुबडे , यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि अशोक डोंगरे , सपोफौ विजय काबंळे , पोहवा सुनिल शिरसाठ , पोना भगवंता मुठे , पोना नितीन लोंढे , पोना अनिल महाजन , मपोना वैष्णवी गावडे , पोना अमोल शिंदे , पोशि राजेश कोकाटे , पोशि गणेश करोटे , पोशि मारूती करचुंडे , पोशि योगेश तिडके यांनी केली आहे .