पिंपरी चिंचवड दि ०१ :- रहाटणी , काळेवाडी येथुन इसम नामे संतोष अंगरख यास उचलुन नेवुन त्याचा कासारसाई येथे खून करून तीन महीन्यापासुन फरार आरोपीस उत्तर प्रदेश येथुन वाकड पोलीसांनी केली अटक . व्यवसायातील आर्थिक वादातुन आरोपी नामे गणेश सुभेदार पवार व त्याचे साथीदारांनी दि . १६/०८/२०२० रोजी रहाटणी , काळेवाडी येथुन इसम नामे संतोष अंगरख यास उचलुन नेवुन त्याचा कासारसाई येथे खून करुन त्याची बॉडी तेथेच पुरुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेबाबत दाखल असलेल्या वाकड पोलीस स्टेशन गुन्हयात एकुण तीन आरोपींना अटक करण्यात आले होते व त्यांचे दोन साथीदार हे हा गुन्हा दाखल झाल्यापासुन सुमारे ३ महीन्यापासुन फरार झाले होते व पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ आरोपी अटक करणेकामी पथक रवाना करण्याच्या सुचना दिल्या होत्या . त्या अनुषंगाने सदर फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी सहा. पोलीस आयुक्त. वाकड विभाग , पिंपरी चिंचवड यांनी वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक. विवेक मुगळीकर यांना लेखी आदेश देवुन तपास पथकाचे सपोनि . हरिष माने यांना सुचना देवुन फरार आरोपीचा शोध घेवुन हजर करणेबाबत कळविले होते . त्याप्रमाणे दिलेल्या सुचनांप्रमाणे वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाचे सपोनि हरिष माने व पोलीस अंमलदार विक्रम जगदाळे , जावेद पठाण , नितीन गेंगजे , शाम बाबा हे फरार आरोपींचा शोध घेत असताना त्यांचेबाबत तांत्रिक व इतर माहीती घेतली असता ते उत्तर प्रदेश येथे पळुन गेले असल्याबाबतची माहीती मिळुन आली त्याप्रमाणे सपोनि हरिष माने व पथकातील पोलीस अंमलदार विक्रम जगदाळे , जावेद पठाण , नितीन गेंगजे यांनी वरिष्ठांचे परवानगीने उत्तर प्रदेश येथे जावुन ज्ञानपुर , भदोही , उत्तरप्रदेश येथुन मोठया शिताफीने गुन्हयातील फरार आरोपी संदीप ऊर्फ चुंगरु लालजी कुमार वय २१ साल , पत्ता- मु . जनी , पो . रामापुर , ता . ज्ञानपुर , जि . भदोही उत्तरप्रदेश याचा तेथिल स्थानिक पोलीसांचे मदतीने शोध घेवुन ताब्यात घेवुन अटक केली . सदरची कारवाई कृष्ण प्रकाश . पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड . रामनाथ पोकळे . अपर पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड , आनंद भोईटे , पोलीस उप आयुक्त , गुन्हे व परि -२ , पिंपरी चिंचवड , गणेश बिरादार . सहा . पोलीस आयुक्त , वाकड विभाग , पिंपरी चिंचवड , यांचे मार्गदर्शनाखाली डॉ . विवेक मुगळीकर , वरिष्ठ पोलीस निरिक्षक , वाकड पो . स्टे . हरिष माने सहा . पोलीस निरीक्षक व तपास पथकातील पोलीस अंमलदार विक्रम जगदाळे , जावेद पठाण , नितीन गेंगजे , शाम बाबा व तपास पथकाचे अंमलदार यांनी केली .