पुणे दि ०४ :- पुणे सुस रोड साई चौक पाषाण जवळ एका महिलेचे सोन्याचे गंठन मोटर सायकल वाल्याने हिसकामारून चोरून नेले होते व चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल होता व आरोपीने लॉकडॉऊन काळात कर्जबाजारी झाल्यामुळे व कर्जाचे हप्ते न फेडताआल्या मुळे त्याणे चोऱ्या करून तो हप्त्याचे पैसे भरण्यास सोनसाखळी चोऱ्या करत होता व त्या आरोपीला चतु:श्रृंगी पोलीसांनी इसमास अटक करून दोन गुन्हे उघडकीस आणले आहे. चतु : श्रृंगी पोलीस स्टेशनचे हददीमध्ये पोलीस उप निरीक्षक प्रेम वाघमोरे व तपासपथकातील स्टाफ असे सोन साखळी चोरी गुन्हयाबाबत माहिती काढत असताना पोलीस उप निरीक्षक प्रेम वाघमोरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की ,सोन साखळी चोरीच्या दाखल गुन्हा करणारे आरोपी काळ्या रंगाची पल्सर मोटर सायकल क्रमांक एम.एच.१२.एस.डब्लू .७४०३ ही असून त्यानेच साई चौक पाषाण जवळ एका महिलेचे सोन्याचे गंठन हिसकावून नेले आहे अशी माहिती मिळाल्याने सदर महिती नामदेव चव्हाण , अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे , पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ४ पुणे शहर , .सहा.पोलीस आयुक्त , रमेश गलांडे यांना देवून त्यांनी केलेल्या सुचना प्रमाणे अनिल शेवाळे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, यांचे मार्गदर्शनाखाली , पोलीस उप निरीक्षक प्रेम वाघमोरे , मोहन जाधव , महेश भोसले , अमलदार प्रकाश आव्हाड , वसिम सिद्दीकी , सारस साळवी , ज्ञानेश्वर मुळे , प्रमोद शिंदे , तेजस चोपडे , मुकुंद तारू , दिनेश गडांकुश , शैलेश सुर्वे , आशिष निमसे यांची टिम तयार करून सदर वाहनाचा नाव पत्ता प्राप्त करून इसम नामे संजय नथु भगत वय ३४ वर्षे रा.शारदा रेसीडन्सी , फ्लॅट नं .१०३ , अंजनी पार्क उत्तमनगर शिवणे पुणे. त्याच्या वर ट्रॅप लावून चतु:श्रृंगी पोलीसांनी गुन्हा उघडकीस आणून गुन्हयात अटक करून आरोपीकडून ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने ,व पल्सर मो.सा.असा एकूण ३लाख ३० हजार रूपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.व दाखल गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उप निरीक्षक प्रेम वाघमोरे हे करीत आहेत .