पिंपरी चिंचवड, दि ०५ :-सांगवी परिसरात अवैधरित्या गोडाऊन मध्ये शासनाने प्रतिबंथित केलेले तंबाखूजन्य पदार्थाचे गुटखा चा माल ठेऊन दुकानदारांना विक्रीसाठी देत होता व दिनांक-५ डिसेंबर रोजी सकाळी ०६/४० वाजता पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे ” पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश पिंपरी चिंचवड यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हदीमध्ये अवैध धंद्यास प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने माहिती काढुन कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने सामाजिक सुरक्षा पथक , हे पिंपरी चिंचवड , पोलीस आयुक्तालयच्या हद्दीमध्ये अवैध धंदयारा प्रतिबंध करण्याचे अनुषंगाने माहिती काढत असताना आज दिनांक ०५ रोजी सामाजिक सुरक्षा पथकास गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की , सांगवी परिसरात जगताप डेअरी , विशाल नगर , सांगवी पुणे येथे आरोपी अशोक चौधरी हा त्याचे विशालनगर येथील गोडाऊन मध्ये गुटख्याची साठवणूक करून त्याची विक्री दुकानदारास तेथून वाहतूक करतो.व सामाजिक सुरक्षा पथकाने बातमी मिळालेल्या ठिकाणी सापळा रचुन सकाळी ०६/४० वा . रामभाऊ बावधने यांचे रूममध्ये विशाल नगर , जगताप डेअरी , सांगवी पुणे येथे छापा टाकुन ११ लाख २७ हजार,६४६ रू किं.चा मुद्देमाल मिळुन आला व अशोक नाराराम चौधरी वय ४५ वर्षे रा . सर्वे नं २७ विशालनगर , वाकड रोड , जगताप डेअरी पुणे यावेविरुध्द सांगवी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास सांगवी पो.स्टे करीत आहे . सदर कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे,पोलीस उप – आयुक्त सुधीर हिरेमठ , सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील , यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे , सपोनि डॉ अशोक डोंगरे , पोउनि धैर्यशिल सोळंके , रापोफी विजय कांबळे , पोहवा सुनिल शिरसाट , पोना नितीन लोंढे , पोना भगवंत मुठे , पोना अनिल महाजन , पोना अमोल शिदे , मपोना वैष्णवी गावडे , पोशि मारुती करचुंडे , पोशि राजेश कोकाटे , पोशि गणेश कारोटे , पोशि योगेश तिडके यांनी केली आहे .