पुणे ग्रामीण दि ०८ :- शिरुर परिसरातील एका मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गेली अडीच वर्षे फरार असलेल्या आरोपीला पकडण्यात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. भाऊ ऊर्फ दगडू सुरेश खोमणे (वय २७, रा. राहु, ता़ दौंड) असे आरोपीचे नाव आहे.
शिरुर गावात ८ ते १० जुलै २०१८ दरम्यान हा प्रकार घडला होता. याप्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात १९ जुलै २०१८ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून खोमणे फरार झाला होता. तो ७ डिसेंबरला राहू गावात येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक पद्याकर घनवट यांच्या सूचनेनुसार सहायक फौजदार दत्तात्रय गिरमकर, पोलीस नाईक मंगेश थिगळे, जनार्दन शेळके, अजित भुजबळ, राजू मोमीन यांनी सापळा रचून त्याला पकडले.चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पुढील कारवाईसाठी त्याला शिरुर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मिलिंद मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहा फौजदार दत्तात्रय गिरमकर,पोना मंगेश थिगळे,पोना जनार्दन शेळके,पोना अजित भुजबळ,पोना राजू मोमीन यांनी केली