पुणे दि १५ :- ब्रेमन चौकाकडे जाणाऱ्या रोडवर संघवीनगर परीसरात एका नागरिकाला लाथाबुक्यांनी मारहाण केल्याप्रकरणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यासह एका महिलेवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यत आला आहे. व चतुःश्रुंगी पोलिसांनी जाधव यांना मंगळवारी दुपारी अटक केली.आहे हर्षवर्धन रायभान जाधव (वय ४३, रा. बालेवाडी) आणि इषा बालाकांत झा (वय ३७, रा. वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.या प्रकरणी अमन अजय चड्डा (वय २८, रा. बोपोडी) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना ब्रेमन चौकाकडे जाणाऱ्या रोडवर संघवीनगर येथे सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.होती व या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चड्डा यांचे आईवडील दुचाकीवरुन ब्रेमन चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरुन दवाखान्यात निघाले होते. यावेळी हर्षवर्धन जाधव यांनी अचानक त्यांच्या कारचा दरवाजा उघडला. त्यामुळे दुचाकीवरुन जाणाऱ्या चड्डा यांच्या आईच्या पायाला मार लागला. या बाबत त्यांच्या वडिलांनी जाधव यांना जाब विचारला. त्यावरुन त्यांच्यात वादावादीला सुरुवात झाली. जाधव यांनी त्यांच्या छातीत व पोटात लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यांच्या आईलाही लाथ मारली. त्यात ते गंभीर जखमी झाले. दोघांना जीवे मारण्याच्या उद्देशाने जिवीतास धोका निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या जखमी दाम्पत्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. पोलिसांनी हर्षवर्धन जाधव व इषा झा यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र दहीफळे अधिक तपास करीत आहेत.