पुणे दि १८ -पुणे कोथरुड मध्ये जेष्ठ दांपत्याचे घरी जबरी चोरी करणारा आरोपीला काही तासातच कोथरुड पोलिसांनी अटक केली होती व बाणेर परीसरात वडिल वयवृध आहेत म्हणुन मेल नर्स ठेवला होता व सेवा निवृत्त जजच्या घरी चोरी केली होती व पुणे सोडून पळून गेलेला आरोपी औरंगाबाद येथून पोलिसांनी अटक केली होती व ही कामगिरी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनचे पी. एस.आय.भोसले, पी.एस.आय.जाधव,व पोलीस हवालदार गडअंकुश आव्हाड, मुळे , चोपडे, तारु, सिध्दीगी, सुर्वे , निमसे , जाधव, प्रमोद शिंदे यांनी कामगिरी केली होती व आरोपी विरोधात या पुर्वी दोन गुन्हे दाखल असुन सुध्दा ए १ नर्सिंग बिरोने त्याला कोणतीही चौकशी न करता कामावर ठेवले होते व या घटनेनंतर “केअर टेकर एजन्सी’कडून होणारे गैरप्रकार पुणे शहरात पुढे आले आहेत. पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा पुरविणाऱ्या काही केअर टेकर एजन्सी गैरप्रकार करत असल्याचे पोलिसांनच्या निदर्शनास आले आहे. त्यांचा शोध घेऊन, सखोल चौकशी केली जाईल. दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, त्याची जबाबदारी पुणे शहर पोलिस उपायुक्तांवर सोपविलेली आहे, असे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुरुवारी स्पष्ट केले. सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होता कामा नये, गुन्हेगारांनी एखादा गुन्हा केला, तरी त्यांची तुरुंगात पाठविण्याची व्यवस्था तयार केली आहे, अशा शब्दात त्यांनी इशारा दिला आहे.त्यांनी शहरातील कायदा-सुव्यवस्था, गुन्हेगारी, वाढते सायबर व आर्थिक गुन्हे, कोरोनाच्या कालावधीतील पोलिसांचे काम या सह विविध विषयांवर
गुप्ता म्हणाले, “”पुणे शहरात ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे, त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य देण्याच्या सूचना पोलिसांना यापूर्वीच दिलेल्या आहेत. कोथरूड व बाणेर घटनेनंतर “केअर टेकर एजन्सी’कडून होणारे गैरप्रकार पुढे आले आहेत. ते रोखण्यासाठी पोलिस उपायुक्तांना आदेश दिले आहेत. त्यांच्याकडून अशा प्रकारांची सखोल चौकशी करून, कारवाई केली जाईल. याबरोबरच विद्यार्थी, महिलांच्या सुरक्षिततेलाही सर्वाधिक प्राधान्य दिले आहे.”वाढते सायबर गुन्हे रोखणे आव्हानात्मक असल्याचे नमूद करीत गुप्ता म्हणाले, “”सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत असून, त्यामध्ये चांगले काम होण्याची गरज आहे. त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न करीत आहोत. पोलिस उपायुक्तांसह तीन ते चार नवीन पोलिस निरीक्षक, कर्मचारी दिले आहेत. त्यांना सायबर गुन्हे रोखण्यासाठीचे तंत्रज्ञानाचे प्रशिक्षणही दिले आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या कामातही झपाट्याने बदल होत आहेत. गुन्हे करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करतानाच गेल्या काही दिवसात पोलिस रेकॉर्डवरील एखाद्याने गुन्हा केल्यास, त्याची तत्काळ तुरुंगात रवानगी करून, त्याला जामीन मिळणार नाही, याची व्यवस्था केलेली आहे.”