पुणे दि २६ :- आपण सर्वांना ज्ञात आहेच की कोरोना व्हायरस हा नवीन रुपात येवून आपल्या समोर नवीन आव्हान घेवून आला आहे.
याचा पुढे प्रसार होऊ नये यासाठी आपण सर्वांनी एकत्र येवून याला लढा देणे आवश्यक आहे.
सद्यस्थितीत प्रतिबंधात्मक उपाय योजनांची पहिली पायरी म्हणून लंडन किंवा युरोपियन देशांमधून पुण्यात आलेल्या यात्रेकरूंना शोधून त्यांची आर टी पी सी आर चाचणी करून पुढील कार्यवाही करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. व
२५ नोव्हेंबर नंतर पुणे शहरात लंडन किंवा युरोपियन देश येथून आलेल्या आणि आरोग्य विभागाने संपर्क न केलेल्या अशा सर्व लोकांना आवाहन करतो की आपण अती त्वरीत नजीकच्या पुणे महापालिका आरोग्य केंद्रात संपर्क करून आपली आर टी पी सी आर चाचणी करून घ्यावी आणि पुढील उपाय योजना राबविण्यास प्रशासनास सहकार्य करावे.