पुणे दि २७ : – पुणे मार्केट यार्डात फळ विभागात अनाधिकृतपणे विक्री करणाऱ्या नऊ जणांनावर बाजार समिती प्रशासनाच्या वतीने कारवाई करून ५ हजार ३१० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. फळ विभागप्रमुख बाबासाहेब बिबवे यांच्या सुचनेनुसार गटप्रमुख बाळासाहेब कोंडे यांनी ही कारवाई केली.आहे वआज दि.२७ रोजी फळ विभागात अनाधिकृतपणे स्टॉल लावून विक्री करणाऱ्यांकडे बाजार समितीच्या कारवाईचा मोर्चा वळविण्यात आला.आहे नऊ अनाधिकृतरित्या विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.आसून दंड आणि जीएसटी मिळून प्रत्येकी ५९० रुपये बाजार समिती प्रशासनाच्या वतीने वसुल करण्यात आले. या कारवाईमुळे अनाधिकृत विक्री करणाऱ्यांवर वचक बसणार आहे. या कारवाईचे विविध बाजार घटकांकडून स्वागत करण्यात येत आहे.