पुणे ग्रामीण दि २८ :- दौंड येथील लिमगाव खलु म्हणजे पुणे व अहमद नगर जिल्याला जोडणारा ब्रिटिश कालीन १५० वर्षाचा पुल आहे.तिथच दुसऱ्या पुलाच काम चालू आहे.हे काम करताना खोदकामात ऐक शिवशंकर भोलेनाथ यांची मूर्तीचे आवशेश सापडले आहे.त्यात मूर्तीचे गळ्यापासून वराचे भाग म्हणजे मस्तक आहे.बाकीचे आवशेशही जवळ पास असल्याचे
सांगण्यात चर्चेत येत आहे.ह्या मूर्तीच्या अवशेषांचे वजन जवळ जवळ ऐक टनाच्या पुढे आहे.उंची जवळ पास पाच फूट आहे.येवढ्या वजनाची वास्तू पाण्याच्या प्रवाहात वाहून येऊ शकत नाही.तीच आस्तित्व हे तिथेच असू शकते असे अंदाज व्यक्त केला जातो.दौंड हे भीमेच्या तीरावर वसलेले शहर आहे.आणि ह्या भीमा नदीचा उगम भीमाशंकर येथे असून नदीच्या तीरावर अंदाजे शेकडो भोलेनाथ ची ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहेत.दौंड च्या घाटावरच ऐतिहासिक पिंड मंदिर आहे.असे अनेक मंदिर आहेत.वडगाव येथे खडकेश्र्वर तर वरावांड,अजनुज येथेही भोलेनाथ ची ऐतिहासिक मंदिरे दिसून येते
दौंड प्रतिनिधी :-.प्रा.महेश मंगल पांडुरंग देशमाने