पुणे दि २८ :- पुणे महानगरपालिकेतर्फे आयोजित व महाराष्ट्र शासन उपक्रमा अंतर्गत ‘ माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘ ‘ अंतर्गत पुणे महानगरपालिका हद्दीमधील महानगरपालिकेच्या शाळा तसेच खाजगी प्रशासनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन दि . १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२० या कालावधी मध्ये करण्यात आले होते . कोविड -१९ या साथीच्या आजाराबाबत जनजागृती होण्यासाठी ” माझे कुटुंब- माझी जबाबदारी या मोहिमे अंतर्गत शालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.व स्पर्धेत एकूण ५०० महानगरपालिका व खाजगी शाळांतील सुमारे ३६ हजार स्पर्धक विद्यार्थी सहभागी झाले होते.व पुणे महानगरपालिका क्षेत्रिय कार्यालय स्तरावर प्रथम तीन क्रमांकाची निवड करुन अंतिम स्पर्धेसाठी पुणे महानगरपालिका स्तरावर अंतिम विजयी क्रमांकाची निवड करण्यात आली . या स्पर्धेसाठी इयत्ता ५ वी व ६ वी , इयत्ता ७ वी व ८ वी , इयत्ता ९वी व १० वी तसेच इयत्ता ११ वी व १२ वी असे चार गट स्पर्धेसाठी सहभागी होते . तर निबंध , पोस्टर , मेसेज ( घोषवाक्य व संदेश ) तसेच शॉर्ट फिल्म असे विषय स्पर्धेसाठी देण्यात आले होते . प्रथम क्रमांकासाठी रक्कम रुपये ५ हजार, द्वितीय क्रमांकासाठी र.रु. ३ हजार, तर तृतीय क्रमांकासाठी र.रु. २हजार रोख पारितोषिक ( धनादेश ) विद्यार्थ्यांना देण्यत आले . यासाठी महानगरपालिका शाळा व खाजगी शाळा यांना स्वतंत्रपणे प्रत्येक गटनिहाय व स्पर्धानिहाय बक्षिसे देण्यात आली . दोन्ही गटात एकूण ६५ विद्यार्थी बक्षिसपात्र ठरलेपैकी महानगरपालिका शाळांचे २६ तर खाजगी शाळांतील ३९ विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले . याप्रसंगी मुरलीधर मोहोळ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि , विविध माध्यमांमार्फत पुणे शहरात जनजागृतीच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाने स्वत : नियम पाळा , स्वयंशिस्त लावून घ्या तरच आपल्यावर राहिलेले संकट दूर होण्यास मदत होणार आहे . तसेच शिक्षण विभागातील व आरोग्य विभागातील सर्व अधिकारी , कर्मचारी , सहकारी व विद्यार्थी यांचे त्यांनी मनापासून धन्यवाद मानून अभिनंदन केले . तसेच मा . अतिरिक्त महापालिका आयुक्त ( इ ) कुणाल खेमनार यांनी सामाजिक सुरक्षिततेविषयी उपस्थितांना माहिती दिली . याप्रसंगी बक्षिस वितरण समारंभा प्रसंगी मा . महापौर मुरलीधर मोहोळ , उपमहापौर . सरस्वतीताई शेंडगे , स्थायी समितीचे अध्यक्ष मा . हेमंत रासने , मा . सभासद श्रीमती सुनिताताई गलांडे , अतिरिक्त महापालिका आयुक्त ( इ ) कुणाल खेमनार , अतिरिक्त महापालिका आयुक्त ( वि ) मा . सुरेश जगताप , शिक्षण अधिकारी मा . शिवाजी दौंडकर तसेच अधिकारी , कर्मचारी , पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .